शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

महिला बालकल्याण सभापतींना वाहनाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 19:30 IST

नाशिक : महिला व बालकल्याण समिती सभापती अपर्णा वामन खोसकर यांना जिल्हा परिषद प्रशासनाने अत्यंत जुनाट वाहन उपलब्ध करून दिल्याने त्यांना तालुका भेटी अर्ध्यावरच सोडून परतण्याची वेळ आल्याचे चित्र आहे. त्यांच्यासह दोन पदाधिकाºयांना वाहने उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेने पाठविलेला प्रस्ताव विभागीय आयुक्तालयात महिन्याभरापासून पडून असल्याचे समजते.गेल्या काही दिवसांपूर्वी सभापती ...

नाशिक : महिला व बालकल्याण समिती सभापती अपर्णा वामन खोसकर यांना जिल्हा परिषद प्रशासनाने अत्यंत जुनाट वाहन उपलब्ध करून दिल्याने त्यांना तालुका भेटी अर्ध्यावरच सोडून परतण्याची वेळ आल्याचे चित्र आहे. त्यांच्यासह दोन पदाधिकाºयांना वाहने उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेने पाठविलेला प्रस्ताव विभागीय आयुक्तालयात महिन्याभरापासून पडून असल्याचे समजते.गेल्या काही दिवसांपूर्वी सभापती अपर्णा खोसकर पेठ तालुक्यातील अंगणवाड्यांची स्थिती पाहण्यासाठी दौºयावर गेल्या होत्या. मात्र त्यांना उपलब्ध करून दिलेले अ‍ॅम्बेसेडर वाहन (एम एच १५ अ‍ेअ‍े २००५) करंजाळीला गेल्यानंतर अचानक बंद झाले. त्यामुळे त्यांना हे वाहन सुरू करण्यासाठी स्थानिकांची मदत घेऊन धावपळ करावी लागली. इकडून तिकडून वाहन कसेबसे सुरू करून त्यांना नाशिक गाठावे लागले. त्यानंतर त्यांनी तालुका भेटींसाठी नातलगांचे वाहन वापरले. त्यांच्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने वाहन उपलब्ध करून द्यावे, यासाठी दोन वाहनांच्या निर्लेखनाचे प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर केला आहे. गेल्या महिन्याभरापासून हे प्रस्ताव मंजुरीवरून रखडल्याचे समजते. सभापती अपर्णा खोसकर यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे दुरुस्त वाहनाची व्यवस्था करण्यासाठी विनंती केली की जिल्हा परिषद प्रशासन विभागीय आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव प्रलंबित असल्याचे सांगून मोकळे होते. त्यामुळे सभापतींच्या तालुका दौरे व अंगणवाडी भेटींवर त्याचा परिणाम होत असल्याची चर्चा आहे.