ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामस्थ यांनी लसीकरणासाठी एकत्रित मागणी तालुका प्रशासनाकडे केली होती. परंतु, सर्व जिल्हाभर लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने सोमवारी (दि.३) नियोजित लसीकरण होऊ शकले नाही. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाने केंद्रातील तयारी पूर्ण केली आहे. सर्व खोल्या स्वच्छ करत सॅनिटायझरने फवारणी केली आहे. लसी लवकर उपलब्ध व्हाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी सरपंच दयाराम सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राची तयारी पूर्ण करण्यात आली. याप्रसंगी पोलीस पाटील प्रल्हाद केदारे, ग्रामसेवक सतीश मोरे, मुख्याध्यापक समाधान सोनवणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश सावंत, खंडू सावंत आणि कर्मचारी उपस्थित होते.
डोंगरगाव येथे लसींची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:22 IST