शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यांच्या सीमेवरील पोटदुखीवर इलाजाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 19:31 IST

ओझर : ‘सबका साथ, सबका विकास’ या ब्रीदवाक्याला कसे काळे फासले जाते याचे ज्वलंत उदाहरण पहायचे असल्यास ओझरजवळील पोटदुखी नावाने परिचित असलेल्या उमाजीनगरला एकदा भेट द्यायला हवी. वीज,पाणी,रस्ता आदी प्राथमिक सुखसुविधांशिवाय एखादे खेडे कसे दिसते ते येथे बघायला मिळते.सत्तरीच्या दशकात आपल्या देशात मूलभूत सुविधा जशा बदलत गेल्या तशा सोयीदेखील मिळत ...

ओझर : ‘सबका साथ, सबका विकास’ या ब्रीदवाक्याला कसे काळे फासले जाते याचे ज्वलंत उदाहरण पहायचे असल्यास ओझरजवळील पोटदुखी नावाने परिचित असलेल्या उमाजीनगरला एकदा भेट द्यायला हवी. वीज,पाणी,रस्ता आदी प्राथमिक सुखसुविधांशिवाय एखादे खेडे कसे दिसते ते येथे बघायला मिळते.सत्तरीच्या दशकात आपल्या देशात मूलभूत सुविधा जशा बदलत गेल्या तशा सोयीदेखील मिळत गेल्या. आज ‘फोरजी व वातानुकूलित’च्या जमान्यात याला एक भलं मोठ्ठं शे-दीडशे घरांचे नगर अपवाद ठरत आहे. मतदान निफाड तालुक्यात; पण वास्तव्याची जागा नाशिक तालुक्याच्या हद्दीत खरं तर हीच सीमेची लालफीत येथील आदिवासी बांधवांच्या आयुष्यात बाधक ठरत आहे.येथे अजूनही विद्युतीकरण नाही, पक्की शाळा नाही. येथील मुले शिकली पाहिजे याच हेतूने वस्तीतील दोन मॅट्रिक पास असलेल्या सविता डबके व मनीषा गांगुर्डे या महिला गेल्या नऊ वर्षंंपासून मुलांना तिसरीपर्यंतचे शिक्षण पालकांनी लोकवर्गणीतूच उभारलेल्या छोट्याशा शेडमध्ये देत आहेत. याबदल्यात येथील नागरिक वर्गणी गोळा करून पंधराशे रु पये मानधन या महिलांना देत आहे. हेतू एकच मुलं शिकली पाहिजे, साक्षर झाली पाहिजे. त्यानंतरच्या शैक्षणिक प्रवासासाठी मुलं-मुली चार किलोमीटरची पायपीट करीत ओझर गाठून चौथी ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेतात.येथे करमणुकीचे साधन नाही. शे-दीडशे घरांपैकी केवळ सहा-सात घरांत टीव्ही चालतो तोदेखील बॅटरीवर. लोकवर्गणीतून बांधलेल्या हातपंपातून मिळणारे पाणी हाच साडेसहाशे लोकांचा एकमेव जलस्रोत आहे. शासनाची कुठलीही मदत नाही, सर्वेक्षण तर मुळीच नाही. कधी पोषण आहाराला हात लागला नाही. मोफत पुस्तके, गणवेशापासून वंचित. आरोग्य सुविधेचा गंधदेखील माहीत नाही. अजून वीजच आली नसल्याने बॅटरीचा उपयोग करून घरातील लाइट लावली जाते. सौरऊर्जेचे पथदीप अनेक वर्षांपासून बंद असल्याने रात्रीचा लख्ख अंधार असतो. फोर-जीची शक्ती हवेत अदृश्य असली तरी संपर्क यंत्रणा मात्र शून्यच.येथील अर्थव्यवस्था मोल मजुरीवर चालत असली तरी तरु णांना लग्न करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.एकीकडे सरकार बारा हजार रु पये हगणदारीमुक्तसाठी अनुदान देत असले तरी सरकारी अनास्थेमुळे साडेसहाशे लोकांमध्ये एकही शौचालय नसल्याने उघड्यावर शौचाला जावे लागते.यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे. उज्ज्वला योजनादेखील पूर्णपणे अंमलात आलेली नाही.