शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तीन तासांची प्रतीक्षा; पदरी मात्र निराशा समृद्धीबाधितांना टोलवले : संघटित होण्याचा राज ठाकरेंचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:53 IST

समृद्धी महामार्गबाधित शेतकºयांना शासकीय विश्रामगृहावर सकाळी ७ वाजेपासूनच बोलावून ठेवले आणि तब्बल तीन तासांनंतर शेतकºयांना ‘राज’दर्शन घडले.

ठळक मुद्देशेतकºयांच्या पदरी निराशाचशेतकºयांचा सरकारविरोधात संघर्ष शेतकºयांना संघटित होण्याचा सल्ला

नाशिक : समृद्धी महामार्गबाधित शेतकºयांना शासकीय विश्रामगृहावर सकाळी ७ वाजेपासूनच बोलावून ठेवले आणि तब्बल तीन तासांनंतर शेतकºयांना ‘राज’दर्शन घडले. सर्वत्र ठोकरलेल्या शेतकºयांना मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडून काहीतरी दिलासा देणारे आश्वासन मिळेल, या अपेक्षेने शेतकºयांनी पटापट खुर्च्या सावरल्या आणि आपल्या व्यथा मांडल्या. परंतु, हा प्रश्न जिल्ह्याचा अथवा तालुक्याचा नाही तर तुमच्या गावाचा आहे. त्यामुळे अगोदर संघटित व्हा. संघटित नसल्यानेच सरकार दबावतंत्राचा वापर करत असल्याचे सांगत राज यांनी कुठलेही आश्वासन न देता शेतकºयांना परतावून लावले. मोठ्या अपेक्षेने आलेल्या शेतकºयांच्या पदरी निराशाच आली आणि ती निराशा कुणीही लपवू शकला नाही.जिल्ह्यातून जाणाºया मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गात बाधित होणाºया शेतकºयांचा सरकारविरोधात संघर्ष सुरू आहे. सरकारकडून दडपशाहीने पोलिसी बळाचा वापर करत जमिनी ताब्यात घेत असल्याचे गाºहाणे मांडण्यासाठी नाशिक दौºयावर आलेल्या राज ठाकरे यांची समृद्धीबाधित शेतकºयांनी भेट घेतली. पूर्वनियोजित भेट ठरल्याने शेतकºयांना सकाळी ७ वाजेची वेळ देण्यात आली होती. एवढ्या सकाळी राज ठाकरे भेटतील काय, हासुद्धा प्रश्न होताच. तरीही मोठ्या अपेक्षेने ४०-५० शेतकरी ७ वाजेपासूनच गोल्फ क्लबवरील शासकीय विश्रामगृहावर जमले. परंतु, सकाळचे १० वाजले तरी राज ठाकरे कक्षातून बाहेर येईना. अखेर, तीन तासांची प्रतीक्षा संपली आणि राज यांच्याशी शेतकºयांनी संवाद साधला. संघर्ष समितीचे राज्य समन्वयक राजू देसले यांच्यासह शेतकºयांनी आपल्या व्यथा मांडल्या. मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत साºयांची भेट घेऊन झाली, परंतु मार्ग निघत नसल्याचेही सांगण्यात आले. त्यावर राज यांनी शेतकºयांना संघटित होण्याचा सल्ला दिला. सदर प्रश्न केवळ तुमच्या गावापुरता मर्यादित आहे. त्यामुळे उर्वरित शेतकºयांनाही बरोबर घ्या. जोपर्यंत संघटित होत नाही तोपर्यंत सरकार तुम्हाला झुलवतच राहील. राजकीय पक्षांकडे फिरून काही उपयोग होणार नाही असे सांगतानाच, तुमच्या आमदार-खासदारांकडे प्रश्न मांडा, असे सांगण्यासही ते विसरले नाहीत. शेतकºयांनी दिलेली निवेदने घेत राज यांनी काहीही आश्वासन न देता चर्चा आटोपती घेतली.