शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

दमदार पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 23:44 IST

नायगाव : शेतात पेरलेलं उगवलं.. मात्र उगवलेलं पाण्याअभावी डोळ्यांदेखत करपू लागलं... वेधशाळेच्या अंदाजापाठोपा.. निसर्गाच्या बेगडी प्रेमानं बळीराजाच्या मनावर चिंतेन घर बनवलं.. अशी बिकट अवस्था सध्या निर्माण झाली आहे. आकाशात दररोज निर्माण होणाºया काळ्या ढगांकडे बळीराजा चातक पक्षाप्रमाणे आतुरतेने पावसाची वाट बघत आहे.

ठळक मुद्देनायगाव खोरे : पाण्याअभावी पिके करपू लागली; बळीराजा चिंतित

नायगाव : शेतात पेरलेलं उगवलं.. मात्र उगवलेलं पाण्याअभावी डोळ्यांदेखत करपू लागलं... वेधशाळेच्या अंदाजापाठोपा.. निसर्गाच्या बेगडी प्रेमानं बळीराजाच्या मनावर चिंतेन घर बनवलं.. अशी बिकट अवस्था सध्या निर्माण झाली आहे. आकाशात दररोज निर्माण होणाºया काळ्या ढगांकडे बळीराजा चातक पक्षाप्रमाणे आतुरतेने पावसाची वाट बघत आहे.यंदा समाधानकारक मान्सून बरसणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज खरा ठरवत पावसाने वेळेवर हजेरी लावून बळीराजाच्या चेहºयावर हसू फुलवलं. वरुणराजाच्या आगमनाने शेतकºयांनी खरिपाची पेरणी व विविध पिकांची लागवड सुरू केली. शेतात पेरणी केलेले पीक रिमझिम पावसावर उगवायला लागले.कोवळे अंकुर जमिनीतून बाहेर पडण्यास सुरुवात होताच पावसाने अचानक डोळे वटारल्याने उगवणारे हे अंकुर सुकलेल्या व कडक झालेल्या मातीतून बाहेर पडण्याच्या आतच पावसाअभावी करपू लागल्यामुळे बळीराजा चिंतित सापडला आहे. खरिपाची पेरणी केलेले सोयाबीन, बाजरी, मूग, उडीद पिके सध्या शेतातील मातीतून उगवत आहे, तर काही उगवले आहे.तसेच लागवड केलेले कोबी, टमाटे, फ्लॉवर, मिरची आदी पिके सध्या शेतकºयांच्या डोळ्यादेखत पाण्याअभावी करपत असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे.दरम्यान, सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोºयात खरिपाचे हजारो एकर क्षेत्रातील पेरणी तसेच लागवड केलेल्या शेकडो एकरवरील विविध पिकांना पाण्याची सध्या नितांत गरज आहे. नायगाव खोºयात कोबी पिकाच्या सुमारे चाळीस हजाराच्या आसपास पुड्यांच्या रोपाची लागवड झाली आहे. एकशे ८५ रुपये दराने सत्तर ते ऐंशी लाख रुपयांची लागवड केलेली रोपे सध्या पाण्याअभावी करपून जात आहे.पिके धोक्यात येण्याची शक्यताहजारो एकरवरील खरिपाचे पीक सध्या पाण्याच्या कमतरतेमुळे कमी-अधिक प्रमाणात उगवत आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत पावसाची कृपा झाली नाही तर नायगाव खोºयासह संपूर्ण तालुक्यातील हजारो एकरवरील क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट ओढावणार हे नक्की. पावसाने हजेरी लावली नाहीतर शेतकºयांना लाखो रु पयांचे नुकसान होईल, असे चित्र सध्या आहे. दररोज सकाळी आकाशात ढगांची गर्दी होत असल्याने शेतकºयांच्या चेहºयावर समाधानाची लकीर दिसते. मात्र संपूर्ण दिवसभरात रिमझिम तर नाहीच; पण पावसाचा थेंबही पडत नसल्यामुळे बळीराजा चिंता व्यक्त करत दुसºया दिवसाची वाट पहातो.

यंदाही मी कोबी पीक घेण्यासाठी ३१ हजारांच्या १७० पुड्या बियाणाची लागवड केली. मात्र लागवडीनंतर रिमझिम पाऊसही गायब झाल्याने सध्या हे संपूर्ण पीक पाण्यावाचून शेतातच करपून गेले आहे. थोड्याच दिवसात रिमझिम पाऊस झाला नाही तरी माझे खरिपाचे लाखो रुपयांचे नुकसान होईल.- शरद आव्हाड,शेतकरी, देशवंडी