शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सातपूर टपाल कार्यालयाला प्रतीक्षा स्वमालकीच्या जागेची

By admin | Updated: November 6, 2014 00:18 IST

लहानशा घरात कारभार : जागा खाली करण्यासाठी मालकाचा तगादा; स्वत:ची जागा सोडून पुन्हा भाड्याच्याच जागेत जाण्याची तयारी

सातपूर : सोळा वर्षांपासून अशोकनगरमधील एका लहानशा घरात भाडेतत्त्वावर टपाल खात्याचा कारभार सुरू आहे. हे घर खाली करण्याची मागणी करण्यात आल्यानंतर पुन्हा आता नव्याने भाड्याचे घर शोधण्यासाठी टपाल खात्याला वणवण करावी लागणार आहे. टपाल कार्यालयासाठी सातपूर कॉलनीत खास राखीव भूखंडावरच प्रशस्त इमारत उभारणे अपेक्षित असताना, पुन्हा भाड्याच्याच घराचा आग्रह कशासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रस्तावित टपाल कार्यालयासाठीच पाठपुरावा करणे गरजेचे आहे.औरंगाबाद गृहनिर्माण मंडळाने (म्हाडा) ४0 वर्षांपूर्वी सातपूरला अल्प, अत्यल्प, मध्यम, उत्पन्न गटासाठी गृह योजना उभारली. भविष्यात परिसराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन सातपूर कॉलनीत टपाल कार्यालयासाठी म्हाडाने मध्यवर्ती ठिकाणी मोठ्या आकाराचा भूखंड राखीव ठेवला आहे व रीतसर टपाल कार्यालयाच्या ताब्यात हा भूखंड देण्यात आला आहे. जवळपास तीस वर्षांचा कालावधी लोटला तरी अद्यापपर्यंत या भूखंडावर टपाल खात्याची इमारत उभी राहिलेली नाही. दरम्यानच्या काळात तत्कालीन नगरसेवक अशोक गवळी यांनी नागरिकांच्या मदतीने पाठपुरावा केला होता. विद्यमान नगरसेवक सलीम शेख यांनीही अपर पोस्ट अधीक्षक व तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांना निवेदन देऊन राखीव भूखंडावर टपाल खात्याची इमारत उभारण्याची मागणी केली आहे. परिसराचा वाढता विस्तार लक्षात घेता सातपूर कॉलनीत टपाल कार्यालय उभारणे अपेक्षित ठरले आहे.१९९८ साली अशोकनगर येथील राज्य कर्मचारी हौसिंग सोसायटीच्या मालकीच्या एका लहान जागेत टपाल कार्यालय उभाण्यात आले आहे. हे घर अतिशय जुने झाले असून, पावसाळ्यात छत गळते. उन्हाळ्यात नागरिकांना उन्हात उभे राहावे लागते. या कार्यालयात दररोज ज्येष्ठ नागरिक आपल्या कामासाठी येतात. त्यांना हे कार्यालय अतिशय अडचणीचे ठरत आहे. कर्मचारीदेखील येथे काम करताना वैतागले आहेत. राखीव भूखंडावर टपाल कार्यालय उभारायचे नसेल तर भाडेतत्त्वावर मोठे प्रशस्त कार्यालय घ्यावे, अशीही मागणी जोर धरू लागली आहे. (वार्ताहर)