शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भगात लालपरीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 16:57 IST

देवळा : कोरोना महामारीमुळे दहा महिन्यांपूर्वी बंद झालेली देवळा तालुक्याच्या ग्रामीण भागातील बससेवा अद्याप सुरू झालेली नसल्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होत असून, त्यांना लालपरी सुरू होण्याची प्रतीक्षा आहे, परंतु चौदा वर्षांपूर्वी खासगी प्रवासी वाहतूक बंद करत, एसटीने प्रवास करण्याचा निर्णय घेत, आदर्श निर्माण करणाऱ्या वाखारी गावात १५ दिवसांपासून नियमित बससेवा सुरू झाली आहे.

ठळक मुद्देदेवळा तालुक्यात विद्यार्थ्यांसह प्रवाशांची गैरसोय

देवळा : कोरोना महामारीमुळे दहा महिन्यांपूर्वी बंद झालेली देवळा तालुक्याच्या ग्रामीण भागातील बससेवा अद्याप सुरू झालेली नसल्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होत असून, त्यांना लालपरी सुरू होण्याची प्रतीक्षा आहे, परंतु चौदा वर्षांपूर्वी खासगी प्रवासी वाहतूक बंद करत, एसटीने प्रवास करण्याचा निर्णय घेत, आदर्श निर्माण करणाऱ्या वाखारी गावात १५ दिवसांपासून नियमित बससेवा सुरू झाली आहे.देवळा येथून राज्य व आंतरराज्य बससेवा पूर्ववत सुरू झाली आहे. कोरोनामुळे बंद असलेली शाळा व महाविद्यालये आता सुरू झाली असून, ग्रामीण भागातून शेकडो विद्यार्थी देवळा येथे शिक्षण घेण्यासाठी येतात, परंतु ग्रामीण भागात अद्याप बससेवा सुरू नसल्यामुळे या विद्यार्थ्यांची, तसेच नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यांना खासगी वाहनांचा आधार घेण्याशिवाय पर्याय रहात नाही. यामुळे खासगी प्रवासी वाहतुकीस चालना मिळत आहे. ग्रामीण भागात प्रवासी सांगतील, त्या ठिकाणी खासगी वाहन उभे केले जाते, यामुळे त्यास पसंती मिळते.तालुक्यातील अनेक गावात बससेवा अपुरी आहे. यामुळे विद्यार्थी, ग्रामस्थांना वेळेवर बससेवा न मिळाल्याने मोठी गैरसोय सहन करावी लागते. बससेवा वाढविण्याची मागणी केली असता, एसटी महामंडळ त्या भागातील खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने बंद करण्याची अट ग्रामस्थांना घालते. खासगी प्रवासी वाहतुकीमुळे एसटी महामंडळाला या गावांना बस सेवा देणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. एसटी महामंडळाला सर्वाधिक स्पर्धा खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांशी करावी लागत आहे.देवळा तालुक्यात लोहोणेर, उमराणे, मेशी, खर्डा, देवळा आदी प्रमुख गावासह इतर गावांतीत अनेक बेरोजगार तरुणांनी बेरोजगारीवर मात करण्यासाठी खासगी वाहने विकत घेऊन प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय सुरू केलेला आहे. कोरोना काळात मंदावलेला खासगी प्रवासी वाहतूक व्यवसायाला ग्रामीण भागातील बंद असलेल्या बससेवेमुळे बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे. सटाणा व कळवण आगाराने देवळा तालुक्याच्या ग्रामीण भागातील त्यांच्या नियमित बससेवा पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सBus Driverबसचालक