शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
6
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
7
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
8
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
9
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
10
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
11
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
12
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
13
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
14
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
15
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
16
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
17
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
18
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
19
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
20
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट

बळीराजाला पावसाची प्रतीक्षा

By admin | Updated: June 6, 2016 23:37 IST

बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यात खरीप हंगामाच्या नियोजनाची लगबग

बेलगाव कुऱ्हे : संपूर्ण जिल्ह्यात भात लागवडीत अग्रेसर असलेल्या इगतपुरी तालुक्यात खरीप हंगामाच्या नियोजनाची लगबग सुरू झाली असून, काही ठिकाणी मशागतीची कामे आटोपली आहेत. दुष्काळात भरडलेल्या बळीराजाला आता पावसाची प्रतीक्षा लागली आहे. शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत. तालुक्यातील १२६ महसुली गावांमध्ये वाड्या व वस्त्यांवरील शेतकरी भात, नागली, वरई, सोयाबीन आदि पिके घेतात. शेतकरी खरीप हंगामात इंद्रायणी, फुले समृद्धी, एक हजार आठ या जातीची भातपिके घेत असतात. तालुक्याचे खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र २३ हजार ३३२ हेक्टर असून, २०१५-१६चे खरीप पेरणीचे उद्दिष्ट्य ३१ हजार १७१ एवढे आहे. मागच्या वर्षीचे पेरणीचे उद्दिष्ट्य ३१ हजार ४३१ होते, तर सरासरी ४७०० मिलीलिटर पर्जन्यमान झाले होते. यावर्षी चांगला पाऊस होण्यासाठी बळीराजा चक्क देवाला साकडे घालीत आहेत. पण अजूनही त्याची प्रतीक्षा संपलेली नाही.२०१५-२०१६च्या खरीप हंगामाचे नियोजन करण्यासाठी ३२ हजार १७१ हेक्टर उद्दिष्ट्य असल्याची माहिती तालुका कृषी विभागाने दिली आहे.गेल्या वर्षाचे लक्ष्यांक २६ हजार ५०१ हेक्टर होते, या क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झालेली असल्याने १०२ टक्के पेरणी झालेली होती.चालू वर्षीच्या खरीप हंगामाचे भात पिकाचे लक्ष्यांक- २४९५०, तर उद्दिष्ट २६५०१ एवढे आहे. नागली लक्ष्यांक- १२०० (उद्दिष्ट ९९७), मका लक्ष्यांक २५० (उद्दिष्ट ३०९), कडधान्य— तूर, मूग, उडीद या पिकाचे लक्ष्यांक १७२, १६५, गळीत धान्य- भुईमूग लक्ष्यांक ५००, ६६८, सोयाबीन लक्ष्यांक- ६००, ७११, खुरसनी- लक्ष्यांक ९८३, ३२१ एवढे आहे.गेल्या वर्षी खरीपपूर्व हंगामात अनेक शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने भातपिकाचे नुकसान केले होते. उत्पादनातदेखील मोठी घट निर्माण झाली होती. तालुक्यातील शेतकऱ्यांना नवनवीन पद्धतीचा अवलंब करण्याच्या पाशर््वभूमीवर तालुका कृषी विभागाकडून तालुक्यातील गावांमध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाच्या माध्यमातून पीक प्रात्याक्षिकाचे आयोजन करण्यात येणार आहे. शेतकरी खरीप हंगामासाठी विविध प्रकारची बी बियाणे घेतात यात होणारी फसवणूक टाळण्यासाठी शास्त्रज्ञ देखील मार्गदर्शन करणार आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजना ३१ जुलैपर्यंत अंतिम तारीख असून, बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी विभागाने केले आहे. (वार्ताहर)