शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-भुसावळ एक्स्प्रेसच्या थांब्यासाठी प्रतीक्षा

By admin | Updated: July 24, 2016 22:37 IST

पुणे-भुसावळ एक्स्प्रेसच्या थांब्यासाठी प्रतीक्षा

नांदगाव : कामायनी एक्स्प्रेसच्या थांब्यासाठी नऊ वर्षे संघर्ष नांदगाव : शहराला जे काही मिळते ते झगडूनच घ्यावे लागते असा इतिहास आहे. मोबाईल, टूजी, थ्रीजी, पाणी, इंटरनेट सुविधा, एखाद्या एक्स्प्रेसचा थांबा हे व असे अनेक आधुनिक व शहराची जीवनरेखा आखणाऱ्या बाबी संघर्षातूनच मिळवाव्या लागल्या आहेत. विषय राज्याच्या अखत्यारितला असो की केंद्राच्या अधिकारातला, नांदगावकरांना आंदोलनाचा धक्का हा द्यावाच लागतो. कामायनी एक्स्प्रेसच्या थांब्यासाठी नऊ वर्षे संघर्ष करावा लागला तेव्हा कुठे कामायनी थांबायला लागली. कोणतीही नवीन गाडी रेल्वे प्रशासनाने सुरू केली आणि ती कमी अंतरात धावणारी असली तरी तिचा थांबा विनासायास येथे मिळत नाही. पुणे- भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेस हे अलीकडचे उदाहरण आहे. मोठ्या शहरात राहून नोकरीच्या ठिकाणी दररोज ये-जा करायचे ही कामकाज संस्कृती आता रुजली आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्यांसाठी सोयीच्या वेळांवर अधिक गाड्यांचे थांबे हा शहरातील कार्यालयांच्या कार्यक्षमतेचा निकष ठरत आहे. सायंकाळी नाशिककडे जाणारी गाडी व सकाळी नाशिक येथून येणाऱ्या गाडीच्या वेळेनुसार कार्यालयांचे कामकाज सुरू होते. अनेकदा कार्यालये सुरू होण्याच्या नियोजित वेळेनंतर व सुटण्याच्या वेळेच्या आधीच रिकामी दिसतात. कारण रेल्वे गाडीच्या वेळा सोयीच्या नसतात. घरी जाण्याची घाई असते. त्यामुळे असे घडते. शहरातील सर्वच कार्यालये, शाळा, महाविद्यालये येथे हा अनुभव येत असतो.मुख्यालयी राहण्याचा नियम केराच्या टोपलीत गेला आहे. मात्र मुख्यालयी न राहता घरभाडे भत्ता पगारबिलात मिळवून हजारो रुपयांचा मलिदा नोकरशाहीच्या खिशात जात आहे. त्याचा विपरीत परिणाम शहराच्या विकास व्यवस्थेवर होत आहे. हा संशोधनाचा भाग आहे.अपडाऊन (ये-जा) हा नोकरी व्यवस्थेचा अविभाज्य भाग मानला, तर युवा फाउंडेशन या तरुणांच्या सामाजिक संस्थेने पुणे-भुसावळ एक्स्प्रेसच्या नांदगाव थांब्याची केलेली मागणी समर्थनीय ठरते. सोशल मीडियामधून ही मागणी व्हायरल झाली आहे. (वार्ताहर)