शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शहर सुधार समितीला प्रस्तावांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 00:21 IST

महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने मोठ्या उत्साहात विषय समित्या गठित केल्या परंतु, आरोग्य समितीवगळता विधी आणि शहर सुधार समित्यांपुढे प्रशासनाकडून प्रस्तावच येत नसल्याने गेल्या महिना-दीड महिन्यांपासून दोन्ही समित्यांच्या बैठका होऊ शकलेल्या नाहीत. समित्यांच्या सभापतींना दिलेल्या सुविधांबाबतही ओरड कायम आहे.

नाशिक : महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने मोठ्या उत्साहात विषय समित्या गठित केल्या परंतु, आरोग्य समितीवगळता विधी आणि शहर सुधार समित्यांपुढे प्रशासनाकडून प्रस्तावच येत नसल्याने गेल्या महिना-दीड महिन्यांपासून दोन्ही समित्यांच्या बैठका होऊ शकलेल्या नाहीत. समित्यांच्या सभापतींना दिलेल्या सुविधांबाबतही ओरड कायम आहे.  सत्ताधारी भाजपाने आपल्या जास्तीत जास्त सदस्यांना सत्तेत सहभाग मिळावा म्हणून विधी, आरोग्य आणि शहर सुधार या तीन समित्या नव्याने गठित करण्यात आल्या. आरोग्य समितीच्या सभापतिपदाची धुरा सतीश कुलकर्णी, शहर सुधारणा समिती सभापतिपदी भगवान दोंदे, तर विधी समिती सभापतिपदी शीतल माळोदे सांभाळत आहेत. महासभेने या समित्यांना दहा लाखापर्यंत खर्चाचे अधिकार दिले असले तरी नगरसचिव विभागाने त्याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविले आहे. आॅगस्ट २०१७ मध्ये या तिनही समित्यांच्या पहिली बैठक घेण्यात आली. त्यात, विधी समितीची सभा २२ आॅगस्टला, तर शहर सुधार समितीची ८ आॅगस्टला सभा झाली. परंतु, त्यानंतर समितीपुढे एकही प्रस्ताव प्रशासनाकडून प्राप्त न झाल्याने दुसºया सभेला मुहूर्तच लाभू शकलेला नाही. त्यामुळे दोन्ही सभापती केवळ कक्षापुरतेच मर्यादित ठरले आहेत. आरोग्य समितीचे सभापती सतीश कुलकर्णी यांनी मात्र सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतल्याने समितीच्या आतापर्यंत तीन सभा पार पडल्या आहेत शिवाय, समितीच्या सदस्यांनी रुग्णालयांना भेटी देऊन पाहणी दौरेही केले आहेत. विधी व शहर सुधार समितीला मात्र अद्याप प्रशासनाने ताकास तूर लागू दिलेला नाही. विषय कोणते द्यायचे, याच गोंधळात प्रशासन अडकले आहेत. त्यामुळे समितीचे सभापतीही आपल्या कार्यकक्षांबाबत संभ्रमित आहेत.वाहनसौख्य नाहीतीनही समितींच्या सभापतींसाठी नवीन वाहने खरेदी करण्याचा निर्णय झालेला आहे. परंतु, अद्याप खरेदी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्यामुळे चार महिने उलटून गेले तरी सभापतींना नवीन वाहनसौख्य लाभू शकलेले नाही. समिती सभापतींना कक्ष पुरविण्यात आले असले तरी त्याबाबतही सभापती समाधानी नाहीत. आरोग्य समितीच्या सभापतींनी याबाबत महापौरांनी बोलाविलेल्या बैठकीत अडचणींचा पाढा वाचला होता.