शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘फटाके बंदी’च्या आदेशाची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:52 IST

दिवाळी सणात निवासी क्षेत्रात फटाके वाजविण्यावर बंदी घालण्याच्या उच्च न्यायालयाच्या दोन दिवसांपूर्वीच्या आदेशाची प्रत अद्याप सरकारकडे व पर्यायाने गृह विभागाला प्राप्त न झाल्याने फटाके विक्रीवर बंदी लादण्याच्या कार्यवाहीबाबत प्रशासकीय यंत्रणेत संभ्रम कायम आहे.

नाशिक : दिवाळी सणात निवासी क्षेत्रात फटाके वाजविण्यावर बंदी घालण्याच्या उच्च न्यायालयाच्या दोन दिवसांपूर्वीच्या आदेशाची प्रत अद्याप सरकारकडे व पर्यायाने गृह विभागाला प्राप्त न झाल्याने फटाके विक्रीवर बंदी लादण्याच्या कार्यवाहीबाबत प्रशासकीय यंत्रणेत संभ्रम कायम आहे. दुसरीकडे मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या सन-२०११च्या आदेशान्वये यापूर्वीच बंदी घालण्यात आल्यामुळे नव्याने आणखी कशावर निर्बंध लादावेत याविषयीही भिन्न मतप्रवाह निर्माण झाले आहेत.दोन दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने या संदर्भात आदेश देताना रहिवासी क्षेत्रात फटाके वाजविण्यावर बंदी घातली आहे, तर तत्पूर्वी दिल्ली न्यायालायानेही दिल्लीच्या एनसीआर भागात फटाके विक्रीवर बंदी घातल्यामुळे यंदा दिवाळी सणात फटाके उडवायचे की नाही याविषयी जबरदस्त खल सुरू झाला असून, हा प्रश्न पर्यावरणावरून थेट राजकीय व त्यातही धर्माशी जोडण्यास सुरुवात झाली आहे. न्यायालयाचा निर्णय असल्याने त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आपसूकच सरकार व प्रशासकीय यंत्रणेवर येऊन पडल्यामुळे त्यांनी फटाक्याच्या परवानग्या तपासून पाहण्यास सुरुवात केली आहे. नाशिक जिल्ह्यात कायमस्वरूपी फटाका विक्रीचे सहा परवाने असून, तात्पुरते म्हणजेच सणासुदीला काही विशिष्ट कालावधीसाठी देण्यात येणाºया परवान्यांची संख्या तीनशेहून अधिक आहे. सर्वोच्च न्यायालयाने २ नोव्हेंबर २०११ रोजी दिलेल्या निर्णयानुसार ध्वनी व हवा प्रदूषणाने जनतेच्या आरोग्यावर होणारे परिणाम रोखण्यासाठी १२५ डेसिबल व त्यापेक्षा मोठा आवाज निर्माण करणाºया फटाक्याच्या उत्पादनावर व त्याच्या विक्रीवर, फोडण्यावर यापूर्वीच बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे मोठ्या आवाजाचे फटाके फोडले जाणार नाहीत याबाबत जिल्हाधिकाºयांनीही अधिसूचना जारी केली असताना आता नव्याने न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणी कशी करावी, असा प्रश्न गेल्या दोन दिवसांपासून आ वासून उभा आहे. जिल्हाधिकारी कार्यालय दोन दिवसांपासून मंत्रालयाशी संपर्क साधून न्यायालयाच्या आदेशाची प्रत अथवा शासनाने या संदर्भात घेतल्या जाणाºया भूमिकेच्या प्रतीक्षेत आहे. परंतु अद्यापही आदेश प्राप्त झालेले नाहीत.