शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा

By admin | Updated: January 9, 2016 23:23 IST

पाणीकपात : महासभेच्या निर्णयावर शिक्कामोर्तब शक्य

नाशिक : सध्याची एकवेळ पाणीकपात सुरू ठेवूनही तब्बल ४९ दिवस शहराला पाणीपुरवठा होऊ शकणार नाही, असे गणित महापालिका प्रशासनाने मांडल्याने वाढीव पाणीकपातीचा चेंडू आता राज्य सरकारच्या कोर्टात असून, महासभेने आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा घेतलेला निर्णय रद्दबातल ठरविणारे सरकार आता नेमकी काय भूमिका घेते, याची प्रतीक्षा नाशिककरांना लागून राहणार आहे. महापालिकेने पाणी वितरणातील सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी दि. २ व ३ जानेवारी रोजी अभियांत्रिकी महाविद्यालयांचे विद्यार्थी आणि पालिकेचे अभियंता यांच्या मदतीने पाणीपुरवठ्याचे सोशल आॅडिट केले होते. या आॅडिटचा अहवाल आयुक्तांनी शुक्रवारी खुला केला असता, पाणीपुरवठा वितरणातील दोष समोर आले, शिवाय पाणीवाटपातील असमतोलही पालिकेच्या निदर्शनास आला. दरम्यान, ३१ जुलैपर्यंत गंगापूर धरणातील आरक्षित पाणीसाठा पुरवायचा असेल तर आणखी पाणीकपात अपरिहार्य असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. पाणीपुरवठा विभागाने जुलैअखेर तब्बल ४९ दिवस शहराला पाणी उपलब्ध होऊ शकणार नसल्याचे वास्तव सांगितल्याने महापालिका प्रशासनाच्याही चिंता वाढल्या आहेत. त्यातच नोव्हेंबर २०१५ मध्ये झालेल्या महासभेने गंगापूर धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याच्या आधारे एकवेळ पाणीकपात सुरू ठेवतानाच आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु स्थानिक भाजपा आमदारांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन पाणीकपातीची गरज नसल्याचे सांगितल्याने पालकमंत्र्यांनी महासभेचा निर्णय रद्द करण्याचा आदेश प्रशासनाला दिला होता. त्यामुळे वाढीव पाणीकपातीचा निर्णय घेताना प्रशासनाला आधी राज्य सरकारशी चर्चा करावी लागणार आहे. दरम्यान, पालकमंत्र्यांनी मागील आठवड्यात पाणीकपातीविषयी सकारात्मकता दर्शविल्याने सरकारकडून वाढीव पाणीकपातीला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता असून, महासभेने घेतलेल्या आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)