शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

आणीबाणीतील मिसाबंदीची प्रतीक्षा संपली.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 19:55 IST

येवला : १९७५ च्या आणिबाणी विरोधात ज्यांना मिसाखाली अटक करण्यात आली व आणीबाणीच्या विरोधात ज्यांनी सत्याग्रह करून कारावास भोगला, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढा दिला कारावास भोगला.अनेक कुटुंबे देशोधडीला लागली अशा सर्वांना मानधन देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आणि सोमवारी राज्य शासनाने पुरवणी मागण्यात ४२ कोटी पैकी ५ कोटी ८७ लाख ४० हजार रु पये वितरणाचे आदेश काढल्याने खऱ्या अर्थाने आम्हाला न्याय मिळाल्याची भावना येवल्यात मिसाबंदींनी व्यक्त केली. लोकमतने याबाबत सातत्याने आवाज उठवला व आम्हाला न्याय मिळवून दिला याबाबत मिसाबंदीनी कृतज्ञता देखील व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देयेवल्यातील १९ मिसाबंदींना मिळणार मानधन

येवला : १९७५ च्या आणिबाणी विरोधात ज्यांना मिसाखाली अटक करण्यात आली व आणीबाणीच्या विरोधात ज्यांनी सत्याग्रह करून कारावास भोगला, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढा दिला कारावास भोगला.अनेक कुटुंबे देशोधडीला लागली अशा सर्वांना मानधन देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आणि सोमवारी राज्य शासनाने पुरवणी मागण्यात ४२ कोटी पैकी ५ कोटी ८७ लाख ४० हजार रु पये वितरणाचे आदेश काढल्याने खऱ्या अर्थाने आम्हाला न्याय मिळाल्याची भावना येवल्यात मिसाबंदींनी व्यक्त केली. लोकमतने याबाबत सातत्याने आवाज उठवला व आम्हाला न्याय मिळवून दिला याबाबत मिसाबंदीनी कृतज्ञता देखील व्यक्त केली आहे.१९७५ ते १९७७ च्या दरम्यान कारावासात गेलेल्या अनेकांच्या प्रपंचाची धूळधाण झाली आहे. सातत्याने मिसा बंदी व सत्याग्रहिच्या पदरात निराशेशिवाय काहीही पडले नव्हते. या दरम्यान काहीतरी पदरात पडेल, या प्रतीक्षेत असलेल्यांपैकी अनेक जेष्ठ स्वर्गवासी देखील झाले. दरम्यान आणीबाणीतील मिसाबंदीना मानधन देण्यासंदर्भात एक उपसमिती नेमण्यात आली होती. या उपसमितीने आणीबाणी विरोधात लढ्यात एका महिन्यापेक्षा अधिक काळ मिसाखाली कारावास भोगला त्यांना दहा हजार, त्यांच्या पश्च्यात पत्नीला पाच हजार, महिन्यापेक्षा कमी कारावास भोगणाºया बंदींना दरमहा पाच हजार, त्यांच्या पश्च्यात पती अथवा पत्नींना अडीच हजाराची पेन्शन थेट मिळणार असल्याने मिसाबंदी व सत्याग्रहीची समाधान व्यक्त केले आहे.यानिमित्ताने येवल्यात आजही ९१ वर्ष वयोमान असलेले पुरु षात्तम भिंगारकर यांचे निवासस्थानी रमाकांत भावसार, सुधाकर कुलकर्णी, धनंजय कुलकर्णी, जयंत पेटकर, जयंत गंगापुरकर यांनी एकत्रीत येत आणीबाणीच्या आठवणींना उजाळा दिला. आणि आता मानधन मिळणार म्हणून समाधान व्यक्त केले होते.येवल्यातील रा. स्व. संघाच्या काही कुटुंबाची वाताहत झाली. येवल्यातील २० राजबंदी सत्याग्रहींना तत्कालीन परिस्थितीत शिक्षेचा सामना करावा लागला. त्यातील ११ राजबंदी सत्याग्रही स्वर्गवाशी झालेत. सध्या ९ सत्याग्रहींचा येवलासह परिसरात रहिवाशी आहे. येवला शहरात स्व. डॉ. कांतीलाल पटेल, स्व. उत्तमचंद चंडालिया, पुरु षोत्तम भिंगारकर, बाळासाहेब गौरकर यांना तत्कालीन मिसा कायद्याखाली अटक करण्यात आली होती.तसेच १४ नोव्हेबर १९७५ ते १४ जानेवारी १९७६ या दोन महिन्याच्या कालावधीत संपूर्ण देशभर आणीबाणीच्या निषेधार्थ सत्याग्रहात कै. जगन्नाथ सोनवणे (मंत्री), कै. बन्सीलाल हलवाई, कै. बाटुमल सिंधी, कै. काशिनाथपंत चव्हाण, कै. दशरथ नागपुरे, व रमाकांत (मामा) भावसार, सुधाकर कुलकर्णी यांचा सहभाग होता.३० डिसेंबर १९७५ रोजी येवला शहरातून दुसºया तुकडीने सत्याग्रह केला. या तुकडीत सर्व महाविद्यालयीन तत्कालीन तरु णांचा सहभाग होता. यात धनंजय कुलकर्णी, जयंत पेटकर, जयंत गंगापूरकर, डॉ.राजेश कांबळे, वसंत खोजे, तसेच कै. दौलत काळे, कै. विकास जोशी व कै. दत्तात्रय चव्हाण (भावसार) यांचा समावेश होता.