शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ अनुदान मदतीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:27 IST

कंधाणे : राज्यातील दुष्काळाने होरपळलेल्या बळीराजा व शेती व्यवसायाला मागील तीन वर्षांत आलेल्या अडचणींमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी शासनाने राज्यातील १५१ तालुक्यातील दुष्काळबाधित शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान जाहीर केले. दोन टप्प्यात देण्यात येणारे हे अनुदान कंधाणेतील बºयाच शेतकऱ्यांना अद्याप न मिळाल्याने मदतनिधी येथील वंचित बळीराजां- साठी मृगजळ ठरू लागली आहे.

ठळक मुद्देकंधाणे : काहींना प्राप्त तर अनेकांना प्रतीक्षा

कंधाणे : राज्यातील दुष्काळाने होरपळलेल्या बळीराजा व शेती व्यवसायाला मागील तीन वर्षांत आलेल्या अडचणींमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी शासनाने राज्यातील १५१ तालुक्यातील दुष्काळबाधित शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान जाहीर केले. दोन टप्प्यात देण्यात येणारे हे अनुदान कंधाणेतील बºयाच शेतकऱ्यांना अद्याप न मिळाल्याने मदतनिधी येथील वंचित बळीराजां- साठी मृगजळ ठरू लागली आहे.तालुक्याला शासनाकडून तीन टप्प्यांतील ५१ कोटी रुपयांचा मदतनिधी प्राप्त झाला असताना अद्यापपर्यंत बºयाच शेतकºयांच्या खाती मदतनिधी प्राप्त झालेला नाही. काही शेतकºयांच्या खाती दोन्ही टप्प्यांतील निधी वितरित झाला आहे. काहींना अद्याप पहिल्या टप्प्यातील मदतनिधी मिळालेला नाही. मदतनिधीच्या चौकशीसाठी बळीराजाला तहसील ते बँकांच्या चकरा मारव्या लागत आहे.चालू वर्षी नाशिक जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील १७ परिमंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. यात गंभीर व मध्यम अशा स्वरूपाची वर्गवारी करण्यात आली होती. बागलाण तालुक्याचा गंभीर स्वरूपाच्या दुष्काळात समावेश करण्यात आला.यात बागलाण तालुक्यातील ९७५६२ शेतकºयांना मदतीसाठी ८३ कोटी ५७ लाखांची मागणी शासनाकडे सादर करण्यात आली होती. मागणीपैकी पहिला हप्ता १७ कोटी ७ लाखांची मदत व दुसरा १६ कोटी ६५ लाखांचा हप्ता व तिसरा हप्ता २० कोटी महसूल विभागाला प्राप्त झाला आहे. शासनाने बागायती पिकांना या मदतनिधीतून वगळले आहे. फक्त जिराईत व बहुवार्षिक फळपिकांचा या मदतनिधीत समावेश करण्यात आला. यातील कोरडवाहू पिकांना हेक्टरी ६८०० रुपये अनुदान जाहीर केले.यातील पहिला हप्ता ३४०० रुपये देण्यात येणार आहे, तर बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी १८ हजार यातील पहिला हप्ता ९ हजार देण्याचा शासन निर्णय झाला आहे. बागलाण तालुक्यातील कंधाणेतील बºयाच शेतकºयांना अद्याप मदतनिधीचा पहिला हप्ताही मिळालेला नाही. याच गावातील ठरावीक शेतकºयांना मदतनिधीचे दोन्ही हप्ते मिळाले आहेत.आधीच शेतमालाचे कोसळलेले बाजारभाव त्यात दुष्काळाचा अभिशाप यामुळे शेतीव्यवसाय संकटात सापडला आहे. शासनाने जाहीर केलेली तोकडी मदत अद्याप प्राप्त झाली नसून ती कुठे अडकली याबाबत मनात प्रश्न निर्माण झाले आहेत.- सुरेश संतोष बिरारीशेतकरी कंधाणे