शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

वाघमारे प्रकरण विभागीय  आयुक्तांच्या कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 01:35 IST

जिल्हा परिषद सदस्यांशी अरेरावी करणे तसेच सदस्यांच्या प्रश्नांना बेजबाबदारपणे उत्तरे देण्याचे धाडस दाखविणाºया लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांना कार्यमुक्त करण्याचा सर्वसाधारण सभेचा ठराव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार असून, त्यांच्या आदेशानंतरच पुढील कार्यवाही होणार असल्याचे वृत्त आहे.

नाशिक : जिल्हा परिषद सदस्यांशी अरेरावी करणे तसेच सदस्यांच्या प्रश्नांना बेजबाबदारपणे उत्तरे देण्याचे धाडस दाखविणाºया लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांना कार्यमुक्त करण्याचा सर्वसाधारण सभेचा ठराव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार असून, त्यांच्या आदेशानंतरच पुढील कार्यवाही होणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, वाघमारे यांच्या वर्तणुकीविषयी सभागृहात प्रचंड गदारोळ होऊनही वाघमारे हे अजूनही आक्षेपार्ह शब्दप्रयोग करीत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरू आहे.जिल्हा परिषदेच्या ल. पा. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वाघमारे यांच्या वर्तणुकीविषयी प्रचंड तक्रारी असल्याने आणि त्यांच्यावर गैरवर्तणुकीसंदर्भात तीन विभागीय चौकशा सुरू असतानाही वाघमारे अद्यापही आक्षेपार्ह विधाने करीत असल्याचे बोलले जात आहे. गेल्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत संपूर्ण सभागृहाने एकमताने वाघमारे यांना कार्यमुक्त करण्याचा ठराव संमत केला आहे. असे असतानाही वाघमारे यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीची हमी देण्यात आलेली नाहीच या उलट त्यांनी आपले काहीच होऊ शकत नसल्याचा पवित्रा घेत  कार्यमुक्त ठरावाची खिल्ली उडविण्याचे काम सुरू केल्याचे बोलले जात आहे.  वाघमारे यांनी सर्वधारण सभेच्या सभागृहात एका प्रश्नाच्या उत्तरात आपणाला काहीच माहिती नसल्याचे आणि आपल्याच सहीच्या पत्राबाबत दाखविलेल्या  बेजबाबदारपणामुळे सदस्य आक्रमक झाले होते. त्यांनी वाघमारे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अध्यक्षांकडे केली असता अध्यक्ष शीतल सांगळे यांनी वाघमारे यांच्या कार्यमुक्तीचा ठराव मांडला. या निर्णयामुळे वाघमारे यांच्यावर लवकरच कारवाई होईल, असे वाटत असताना अद्याप त्यांना कोणतेही पत्र प्राप्त झाले नसल्याचे समजते. वाघमारे यांच्याविषयीचा ठराव आणि त्यांच्या वर्तणुकीविषयी यापूर्वी झालेल्या तक्रार अर्जांची माहिती विभागीय आयुक्तांना सादर केली जाणार असल्याचेही समजते. वाघमारे यांच्याविषयी सभागृहाने केलेल्या ठरावाची प्रत आणि त्या संदर्भातील मागणीपत्र विभागीय आयुक्तांना सादर केले जाणार असून, त्यानंतर विभागीय आयुक्त योग्य तो निर्णय जाहीर करणार आहे. दरम्यान, सभेचे इतिवृत्त बनविण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश कर्मचाºयांना देण्यात आले आहे. जोपर्यंत विभागीय आयुक्तांना अहवाल सादर केला जाणार नाही तोपर्यंत वाघमारे यांच्यावरील कारवाईदेखील टळणार आहे. मात्र आता वाघमारे यांच्यावर कारवाई अटळ मानली जात आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद