शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचालकावर उदरनिर्वाहासाठी मजुरीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 00:14 IST

कोरोनाचा फटका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदीने लालपरी आगारातच लॉक झाली. अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात कंटेन्मेंट झोनवगळता स्थानिक स्तरावर जिल्हाअंतर्गत बसफेऱ्या सुरू करण्याचा प्रयत्न झाला. परंतु प्रवाशांनी कोरोनाच्या भीतीने लालपरीकडे पाठ फिरवली. परिणामी लालपरी रस्त्यावर धावलीच नाही. ७ जुलैपासून स्थानिक बस फेºया सुरू झाल्या असून, आता येवला-नाशिक फेºयाही सुरू झाल्या आहेत. मात्र, प्रवाशांचा अल्पप्रतिसाद आहे. लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येऊन एसटीला पहिले दिवस येतील, अशी कर्मचारीवर्गाची आशा आहे.

ठळक मुद्देयेवला : गवंड्याच्या हाताखाली करावे लागते काम; पोटासाठी संघर्ष

योगेंद्र वाघ ।लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : कोरोनाने अनेक छोटेमोठे उद्योग-व्यवसाय बंद झाले तर अनेक कंपन्याही टाळेबंद झाल्या. यामुळे अनेक बेरोजगार झाले असल्याने जगण्याच्या संघर्षात पोटापाण्यासाठी अनेकांना मजुरी करावी लागत आहे. एसटी महामंडळाच्या येवला आगारातील बसचालक उदरनिर्वाहासाठी गवंड्याच्या हाताखाली मजुरी करण्याची वेळ आली आहे.कोरोनाकाळात सर्वांनाच घरात बसावे लागले. परिणामी जवळील पैसे संपल्यानंतर जगण्यासाठी, पोटासाठी संघर्ष करावा लागतो आहे. सध्या अनलॉक टप्पा तीन सुरू झालेला असला तरी अनेक कंपन्या वा अस्थापना अजूनही सुरू झालेल्या नाहीत. एसटी महामंडळाच्या बसेस पूर्ण क्षमतेने प्रवाशीवर्गाअभावी रस्त्यावर धावत नसल्याने महामंडळाच्या सेवेत असणाºया अनेकांपुढे उदरनिर्वाह कसा चालवावा, कुटुंब कसे सांभाळावे असा गंभीर प्रश्न पडला आहे. एसटी सेवाच बंद पडल्याने काम नाही, पगार नाही अशा अवस्थेत असणाºया येवला येथील आगारातील चालक विजय खैरनार यांनी पोटासाठी गवंड्याच्या हाताखाली मजूर म्हणून काम सुरू केले आहे. या रोजंदारीतून मिळणाºया पैशातून ते आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत आहे.येवला आगारात एकूण २४३ कर्मचारी कार्यरत आहेत. यात प्रशासकीय कर्मचारी २१, चालक ११५, वाहक ८० तर कार्यशाळा कर्मचारी २७ आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महामंडळाने एप्रिलमध्ये पूर्ण, मार्चमध्ये ७५ टक्के, मेमध्ये ५० टक्के तर जून, जुलैमध्ये पगारच दिलेले नाही. पगाराअभावी कर्मचाऱ्यांपुढे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पोटापाण्यासाठी काहींनी मिळेल ते काम करणे पसंत केले असून, काहींनी छोटे छोटे व्यवसायही सुरू केले आहेत.मी येवला डेपोमध्ये गेल्या चार वर्षांपासून वाहक म्हणून काम करतो. सध्या कोरोनामुळे एसटीकडे प्रवासी यायला तयार नाही. सध्या बसेस आगारात उभ्या आहेत. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कामाचा शोध घेतला, मिस्तरीकडे काम मिळाले. दोन महिन्यांपासून मी त्यांच्याकडे मजुरी काम करतो. वाळू चाळायचे, माल कालवायचे, पाट्या भरून द्यायचे, विटा द्यायचे काम करतो. माझ्या कुटुंबात दोन मुली, एक मुलगा, पत्नी आहे.- विजय खैरनार, चालक, येवला बस आगार

टॅग्स :ST Strikeएसटी संपcorona virusकोरोना वायरस बातम्या