शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

वडनेर भैरवला जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 17:24 IST

वडनेर भैरव : वडनेर भैरव ग्रामपालिका, वडनेर भैरव पोलीस स्टेशन आणि वडनेर भैरव व्यापारी असोसिएशनच्या वतीने ह्यब्रेक द चेनह्ण याअंतर्गत कोरोना रुग्णवाढीला आळा बसावा म्हणून २५ एप्रिलपर्यंत ह्यकडक जनता कर्फ्यूह्णचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सरपंच सुनील दत्तात्रेय पाचोरकर, उपसरपंच योगेश अशोक साळुंखे, ग्राम विकास अधिकारी रोशन बळवंत सूर्यवंशी यांनी दिली.

ठळक मुद्देब्रेक द चेन : अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद

वडनेर भैरव : वडनेर भैरव ग्रामपालिका, वडनेर भैरव पोलीस स्टेशन आणि वडनेर भैरव व्यापारी असोसिएशनच्या वतीने ह्यब्रेक द चेनह्ण याअंतर्गत कोरोना रुग्णवाढीला आळा बसावा म्हणून २५ एप्रिलपर्यंत ह्यकडक जनता कर्फ्यूह्णचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सरपंच सुनील दत्तात्रेय पाचोरकर, उपसरपंच योगेश अशोक साळुंखे, ग्राम विकास अधिकारी रोशन बळवंत सूर्यवंशी यांनी दिली.पहिल्याच दिवशी बंदला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संपतराव वक्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली वडनेर भैरव व्यापारी, वैद्यकीय अधिकारी, गावातील बँक, शेतकरी उत्पादक आणि भाजीपाला विक्रेते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीचा उद्देश सरपंच सुनील दत्तात्रय पाचोरकर यांनी उपस्थितांना सांगितल्यानंतर बैठकीस उपस्थित असलेल्या प्रत्येकाने आपापल्या विभागाचे मत याप्रसंगी प्रदर्शित केले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने कोरोना रुग्णसंख्या कमी व्हावी म्हणून करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती त्याचबरोबर लसीकरणाबाबत होत असलेल्या कामाची माहिती दिली.कृष्णा भोये यांनी शासकीय नियमांच्या अधीन राहून पोलीस स्टेशनतर्फे कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती आणि समूहावर करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.या बैठकीस सह्याद्री कन्स्ट्रक्शनचे संचालक बापूसाहेब पाचोरकर, बाळासाहेब माळी, अमोल माळी, बाळासाहेब विष्णू माळी, सुरेश वक्ते, अरुण पवार, डॉ. खैरनार, डॉ. वाल्मीक पाटील, पोलीस कर्मचारी कृष्णा भोये, नीलेश सोनवणे, कैलास पाटील, महाराष्ट्र बँक अधिकारी गुड्डू गांगुर्डे, विठ्ठल गचाले, राजेश खानापुरे आदी उपस्थित होते.दुकाने सील करून दंड आकारणारव्यापारी असोसिएशनच्या वतीने संजय शेलार, शिवाजी आहेर, अक्षय शहा, राजू मुल्ला यांनी आपले विचार मांडताना गावातील आरोग्याच्या दृष्टिकोनातून व्यापारी संघटना जे जे शक्य आहे ते ते नक्कीच करेल. जे व्यापारी ग्रामपंचायतीने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करतील त्यांचे दुकान ग्रामपंचायतीने एक महिना सील करून पाच हजार रुपये दंड आकारावा, असा निर्णय घेण्यात आला. व्यापाऱ्यांनीसुद्धा आपल्या गावच्या दृष्टिकोनात नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले. वडनेर भैरव येथे कोरोना रुग्ण विलगीकरण कक्ष करता येईल का? यावर चर्चा होऊन सर्व बाजू पडताळून पाहता येतील, असे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्राम विकास अधिकारी रोशन सूर्यवंशी यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSocialसामाजिक