शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

वाड्याला झळाळी

By admin | Updated: April 12, 2016 00:29 IST

देवपूर : पुरातन वास्तू जनत करण्याचा प्रयत्न

 शैलेश कर्पे सिन्नरसिन्नर तालुक्यातील देवपूर येथील ऐतिहासिक राणेखान वाड्यात एमआयडीसी पोलीस ठाणे, देवपूर ग्रामपंचायत, शंभूराजे गु्रप व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तापासून स्वच्छता अभियानास प्रारंभ करण्यात आला आहे. तीन दिवसांपासून राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहिमेमुळे राणेखान वाड्याला झळाळी प्राप्त झाली आहे. पुरातन व ऐतिहासिक वास्तू जतन करण्यासाठी पोलीस व ग्रामस्थांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे. महादजी शिंदे यांचे निष्ठावान सेवक राणेखानच्या वास्तव्यामुळे देवपूर गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. देवनदीच्या तीरावर आजही राणेखान वाडा दिमाखात उभा आहे. वाड्याची पडझड झाली असली तरी तो जतन करण्याचे प्रयत्न या मोहिमेतून करण्यात येत असल्याचे दिसते. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी पुढाकार घेऊन सदर वास्तू जतन करण्यासाठी ग्रामस्थांना आवाहन केले होते. सरपंच मदन गोळेसर, शंभूराजे गु्रपचे तुषार गडाख, डॉ. दीपक गडाख, अविनाश गडाख यांच्यासह ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सकाळी ७ वाजताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सपकाळे व त्यांचे कर्मचारी राणेखानच्या वाड्यात हजर झाले. सुरुवातीला राणेखान यांच्या मुख्य कबरीचा मकबरा साफ करून मौलवींच्या हस्ते पूजन करून चादर अर्पण करण्यात आली. त्यानंतर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यास प्रारंभ करण्यात आला. शंभूराजे ग्रुपच्या वतीने जेसीबी उपलब्ध करून देण्यात आला होता. वाड्यात अस्ताव्यस्त पडलेले दगड जमा करण्यात आले. उपसरपंच बाळासाहेब कळींबे, ग्रामपंचायत सदस्य संजय गडाख, रघुनाथ गोळेसर, विकास गडाख, म्हाळू खोले, भालचंद्र घरटे, नानासाहेब खुळे, अनिल गडाख, सचिन गडाख, अनिल गडाख, विलास गवळी, शरद गडाख, अनिल कर्डिले, दीपक गडाख, संदीप गडाख, प्रशांत गवळी, दिनेश गडाख, अनिवाश पाटील, संजय गायकवाड, सतीश गायकवाड, इलियास खतिब, दीपक गायकवाड, भय्या गडाख, भय्या जहागीरदार, विलास इघे, सोपान गडाख, रवींद्र गडाख, अमोल गडाख, भाऊसाहेब गडाख यांच्यासह ग्रामस्थ या मोहिमेत सहभागी झाले होते.