शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

वडाळा, अशोका-रविशंकर मार्ग नव्हे ‘जलमार्ग’; तीनही नाल्यांना पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 15:01 IST

अशोका शाळेपासून पुढे विजय-ममता सिग्नलपर्यंत वाहतूक रोखली गेली आहे. रविवारची सुटी असल्यामुळे या भागातील अबालवृध्द रस्त्यावर उतरले आहे. मुख्य रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागल्याने त्यामध्ये नागरिक आनंद लुटताना दिसून आले.

ठळक मुद्देमोकळ्या भुंखंडांना तलावाचे स्वरूप प्राप्त संपुर्ण वडाळा रोड पाण्याखाली गेला.पुलांवरून नदीचे पाणी वाहू लागल्याने वाहतूक बंद शहर व परिसरात कलम १४४ अन्वये जमावबंदी आदेश लागू

नाशिक : वडाळागाव परिसरासह विनयनगर, इंदिरानगर, रविशंकर मार्ग, अशोकामार्ग, पखालरोड, हॅप्पीहोम कॉलनी या भागाचा शहराशी संपर्क तुटला आहे. नासर्डी नदीवरील वडाळारोड, पखालरोड, इस्कॉन मंदिराजवळील पुलांवरून नदीचे पाणी वाहू लागल्याने इंदिरानगर, मुंबईनाका, उपनगर पोलिसांनी वाहतूक बंद केली आहे.रविशंकर मार्गावरून वाहणारा नाला क्षत्रिय समाज मंगल कार्यालयाच्या पाठीमागे ओव्हरफ्लो झाल्याने पाण्याचे लोंढा रस्त्यावर वाहू लागला आहे. यामुळे थेट विजय-ममता सिग्नलपर्यंत गुडघ्याएवढे पाणी साचले आहे. तसेच पखालरोडवरील समतानगरमधून नाला रस्त्यावर आल्यामुळे अशोका शाळेजवळ दुभाजकापर्यंत तलाव साचला आहे. तसेच अशोका मार्गावरील नाशिक मर्चंट बॅँके शेजारून वाहणारा नालादेखील रस्त्यावर वाहू लागल्याने तेथून संपुर्ण अशोका मार्ग जलमय झाला आहे. अशोका मार्गावर दुतर्फा दुभाजकाच्या उंचीपर्यंत पाण्याचे पाट वाहू लागले आहे. कल्पतरूनगर, सिध्दीविनायक पार्क, नारायणबापूनगर, आदित्यनगर, गणेशबाबानगर या भागात पाण्याचे तळे साचले आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

रविशंकर मार्गावर जाणारी पुणे महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच अशोका शाळेपासून पुढे विजय-ममता सिग्नलपर्यंत वाहतूक रोखली गेली आहे. रविवारची सुटी असल्यामुळे या भागातील अबालवृध्द रस्त्यावर उतरले आहे. मुख्य रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागल्याने त्यामध्ये नागरिक आनंद लुटताना दिसून आले. अशोका मार्गावरून दुतर्फा पाण्याचे पाट वाहू लागल्याने ‘जलमार्ग’ तयार झाला आहे. कुर्डूकरनगरपासून विजय-ममता चिंचेच्या वृक्षाजवळील चौफुलीपर्यंत रविशंकर मार्गावर पाण्याचे पाट मोठ्या प्रमाणात वाहत होते. यामुळे येथून मार्गक्रमण करणे धोक्याचे झाले आहे. अग्निशामक दलाला या ठिकाणी पाचारण करण्यात आले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जेसीबीला बोलावून नाल्यासमोरील दुभाजक तोडण्यात आले. त्यामुळे दुपारी दीड वाजेपासून पाण्याचे प्रमाण काहीसे कमी झाले होते. फायरमन प्रमोद लहामगे, जगदीश देशमुख, बंबचालक संजय घुगे यांनी ध्वनिक्षेपकावर उद्घोषणा करत रस्त्यावर वाहणाऱ्या नाल्यांच्या पूरातून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आपआपल्या घरी जाण्यास सांगितले. तसेच शहर व परिसरात कलम १४४ अन्वये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

वडाळा चौफूलीपासून पुढे म्हसोबा महाराज मंदीराजवळील नालादेखील ओव्हरफ्लो झाल्यामुळे खोडेनगर, अक्सा कॉलनी, जयदीपनगर, मिल्लतनगर या भागात पाणी शिरले. येथील मोकळ्या भुंखंडांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. तसेच वडाळा-नाशिक या मुख्य रस्त्यावरून नाल्याचे पाणी वाहू लागल्याने वडाळावासीयांना चौफूलीवरून साईनाथनगरमार्गे जावे लागले. चिश्तिया कॉलनी, मिल्लतनगर परिसरात संपुर्ण वडाळा रोड पाण्याखाली गेला. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली.