नाशिक : येथील वडाळागावातील सावित्रीबाई फुले झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या पहाडे कुटुंबामधील सुरेखा पहाडे यांचे त्यांच्या पतीसोबत घरगुती भांडण झाले. दरम्यान, त्यांचे पती संशयित जिवाजी पहाडे यांनी रागाच्या भरात चाकूने पत्नीला भोसकले. यामध्ये सुरेखा या गंभीर जखमी झाल्या. सदर प्रकार लक्षात आल्यानंतर जखमी अवस्थेत सुरेखा यांना संशयित जिवाजी यांच्या भावाने जिल्हा शासकिय रुग्णालयात हलविले. उपचार सुरू असताना सुरेखा यांचा मृत्यू झाला. संशयित जीवाजी यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास इंदिरानगर पोलीस करीत आहेत.
वडाळागावात पतीने पत्नीला भोसकले : महिला मयत
By admin | Updated: April 10, 2017 16:51 IST