शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

वडाळा-अशोका मार्ग परिसराचा पाणीप्रश्न सुटणार

By admin | Updated: May 10, 2014 23:54 IST

दिलासा : दोन्ही जलकुंभांच्या तपासणीला प्रारंभ

दिलासा : दोन्ही जलकुंभांच्या तपासणीला प्रारंभवडाळागाव : गेल्या अनेक वर्षांपासून वडाळागाव व अशोका मार्ग परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती. कधी कमी दाबाने तर कधी अपुरा पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार या भागांमधून केली जात होती. त्यामुळे या परिसराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रभाग ३८ मध्ये दोन नवीन जलकुंभ बांधण्यात आले असून, जूनच्या पहिल्या आठवड्यात या जलकुंभांवरून पाणीपुरवठा केला जाणार असल्याची शक्यता आहे.वडाळागावातील महारुद्र हनुमान मंदिराच्या मागील बाजूस व पखालरोड येथे प्रत्येकी दोन जलकुंभ महापालिकेने नव्याने उभारले आहेत. या दोन्ही जलकुंभांची क्षमता वीस दशलक्ष लीटर असून, या जलकुं भांचे काम पूर्णत्वास आले आहे. दररोज एक-दोन लीटर पाणी भरून जलकुंभांची तपासणी केली जात असल्याचे उपमहापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले. गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र ते पखालरोड जलकुंभ व वडाळागाव जलकुंभापर्यंत वीस इंच व्यासाच्या मुख्य जलवाहिन्या जोडण्यात आल्या आहेत. तसेच या जलवाहिन्यांद्वारे सद्यस्थितीत प्रभागातील कमी व्यासाच्या जलवाहिन्या जोडणीचे कामदेखील पूर्ण झाले आहे. इन्फो........या परिसराला होणार लाभसंपूर्ण वडाळागाव परिसर, वडाळरोडवरील चिश्तिया कॉलनी, जयदीपनगर, मिल्लतनगर, अशोका मार्ग, पखालरोड, खोडेनगर, विधातेनगर, कल्पतरूनगर, हॅप्पी होम कॉलनी, नारायणनगर, गणेशबाबानगर, रविशंकर मार्ग, कुर्डूकरनगर, स्टेट बॅँक कॉलनी, डीजीपीनगर अशा प्रभाग ३८ मधील सर्वच उपनगरीय वसाहतींना नवीन जलकुंभांचा लाभ होणार आहे. .वडाळावासीयांचा संघर्ष संपुष्टातवडाळागावाला गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती. राजीवनगर च‹ा पार्क जलशुद्धीकरण केंद्राचा वडाळागाव हा अखेरचा टप्पा म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे रहिवाशांना नेहमीच पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. परिणामी वडाळागावात नेहमीच कमी दाबाचा पाणीपुरवठा ही नित्याची बाब झाली होती; मात्र नवीन जलकुंभामुळे पाण्यासाठी करावा लागणारा संघर्ष संपुष्टात येणार आहे.  पाणीपुरवठ्याची समस्या हद्दपारमाझा प्रभाग हा जुन्या चार वार्डांचा मिळून तयार झाला आहे. अशोका मार्ग परिसर हा झपाट्याने विकसित होत असून, लोकसंख्यादेखील वाढत असून, पाणीपुरवठ्याची समस्या उद्भवू नये, यासाठी महापालिके कडे पाठपुरावा करून अशोका मार्ग व वडाळ्यात जलकुंभ बांधले. यामुळे प्रभागात पाणीपुरवठ्याची कोणतीही समस्या राहणार नाही. - सतीश कुलकर्णी, उपमहापौर