शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कर्तृत्वाने समाजात स्थान मिळवा वायुनंदन : व्ही. एन. नाईक संस्थेत पदवीप्रदान सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:56 IST

नाशिक : उदयोन्मुख विद्यार्थी घडत आहेत. हा विद्यार्थी व्यावसायिक विचाराने मार्गक्रमण न करता सामाजिक संवेदनशीलतची जाणीव ठेवणारा असल्याने आपल्या कर्तृत्वाने समाजात स्थान मिळवेल याची खात्री आहे,

ठळक मुद्देमहाविद्यालयाचा तिसरा पदवीग्रहण सोहळाअभ्यास स्वत:ची जागा निर्माण करीत असते

नाशिक : महाराष्टÑाला प्रगल्भ असा सामाजिक आणि शैक्षणिक वारसा लाभला असल्याने, अनेक उदयोन्मुख विद्यार्थी घडत आहेत. हा विद्यार्थी व्यावसायिक विचाराने मार्गक्रमण न करता सामाजिक संवेदनशीलतची जाणीव ठेवणारा असल्याने आपल्या कर्तृत्वाने समाजात स्थान मिळवेल याची खात्री आहे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांनी केले.क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लोकनेते गोपीनाथराव मुंढे अभियांत्रिकी महाविद्यालय आणि दिंडोरी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाचा तिसरा पदवीग्रहण सोहळा व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११२ व संयुक्त पदवीग्रहण सोहळा नुकताच संस्थेच्या प्रांगणात पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. वायुनंदन बोलत होते. उपेक्षित वर्गाला शैक्षणिक समूहात जोडून त्यांचा विकास करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. मात्र सामाजात कर्तृत्वाने स्थान मिळविण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे. कोणतीही पदवी किंवा अभ्यास स्वत:ची जागा निर्माण करीत असते, त्यामुळे इतरांशी तुलना न करता विद्यार्थ्यांनी सामाजिक कर्तव्य आणि सहकार्याची भावना ठेवून मार्गक्रमण करावे. जेणेकरून आपल्यासह इतरांचा विकास होण्यास मदत होईल, असेही डॉ. वायुनंदन म्हणाले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर धात्रक, सरचिटणीस हेमंत धात्रक, सहचिटणीस अ‍ॅड. तानाजी जायभावे, विश्वस्त डॉ. धर्माजी बोडके, संचालक महेश आव्हाड, शिक्षणाधिकारी आर. सी. सोनवणे, संदीप फाउंडेशनचे डॉ. दिवेदी, प्राचार्य डॉ. शातांराम बडगुजर, डॉ. संजय सानप, तुलसीदास सुतार, उपप्राचार्य दिलीप कुटे, परीक्षाधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे, प्रा. आर. एम. शेख, विद्यापीठ प्रतिनिधी किरण सोनवणे, राजेंद्र संसारे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. शरद काकड यांनी केले, प्रास्ताविक डॉ. शांताराम बडगुजर, परिचय श्रीमती मुंढे, तर आभार तुलसीदास सुतार यांनी मानले.