शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

व्हीव्हीपॅट देणार आता मतदानाची खात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 17:34 IST

पेठ : आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणूका जवळ आल्याने राजकिय पक्षांबरोबर निवडणूक आयोगानेही आपली प्रशासकिय तयारी सुरू केली असून ईव्हीएम मशीनबाबत मतदारांमध्ये असलेले गैरसमज दुर करण्यासाठी आता व्हीव्हीपॅट (VVPAT)  नावाचे नवीन मशीन विकॅसत करण्यात आले असून याद्वारे मतदाराला त्याच्या मताची खात्री पटणार आहे.

ठळक मुद्देमतदार जनजागृती अभियान : नव्या मशिनबाबत मतदारांना उत्सुकता

पेठ : आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणूका जवळ आल्याने राजकिय पक्षांबरोबर निवडणूक आयोगानेही आपली प्रशासकिय तयारी सुरू केली असून ईव्हीएम मशीनबाबत मतदारांमध्ये असलेले गैरसमज दुर करण्यासाठी आता व्हीव्हीपॅट (VVPAT)  नावाचे नवीन मशीन विकॅसत करण्यात आले असून याद्वारे मतदाराला त्याच्या मताची खात्री पटणार आहे.यापुर्वी झालेल्या मतदान प्रक्रि येत ईव्हीएम मशीन बाबत अनेक वेळा शंका घेतल्या गेल्या. यावरून राजॅकय पक्षांमध्ये आरोप- प्रत्यारोपही झाले. आपण केलेले मतदान नेमके त्याच उमेदवाराच्या खात्यात जमा झाले किंवा नाही याची मतदाराला खात्री नव्हती. त्यामुळे मतदार संशयानेच मतदान करून बाहेर पडत असे. जिंकून आलेल्या उमेदवारावर मतदान यंत्रात सेटींग केल्याचे आरोपही होतांना दिसून आले.यावर निवडणूक आयोगाने संशोधन करून आता व्हीव्हीपॅट नावाचे अजून एक मशीन विकसित केले असून हे मशीन बॅलेट युनिट सोबत मतदान कक्षात ठेवण्यात येणार आहे. मतदाराने मतदान केल्यानंतर सात सेकंदाच्या आत सदरच्या मशीनवर मतदाराला आपल्या मताची खात्री करता येणार आहे. त्यामुळे आता मतदाराला कोणत्याही प्रकारचा संशय राहणार नाही, याची दक्षता निवडणूक आयोगाकडून घेण्यात येत आहे.मतदार जनजागृती अभियाननिवडणूक आयोगाने केलेल्या या नवीन बदलाची मतदारांना माहीती व्हावी यासाठी पेठ तालुक्यात दि. १७ ते २७ डिसेंबर २०१८ दरम्यान मतदार जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. चित्ररथाव्दारे मतदारांना या नव्या यंत्राची माहीती व प्रात्यक्षिक दाखवण्यात येत असून शासकिय अधिकारी व कर्मचारी यांचे दोन पथक तयार करण्यात आले आहेत. सदरचा चित्ररथ गावागावात जाऊन मतदारांना कर्मचाऱ्यांमार्फत प्रात्यक्षिक दाखवणार असल्याने आगामी निवडणूकांमध्ये या नव्या तंत्रज्ञानाचे मतदारांना आकर्षण राहणार आहे.प्रतिक्रि या -निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनेनुसार प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी तालुक्याला मशीन प्राप्त झाले आहे. त्यासाठी दोन पथकांच्या माध्यमातून आगामी दहा दिवसात पेठ तालुक्यात विविध गावांना भेटी देऊन मतदारांना माहीती व प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे. यासाठी राजकिय पक्षांचे पदाधिकारी व त्यांचे प्रतिनिधी यांनी जनजागृतीसाठी सहकार्य करण्याची अपेक्षा आहे. या संदर्भात राजकिय पक्षांच्या प्रतिनिधींची स्वतंत्र बैठक घेऊन मार्गदर्शन करण्यात आले आहे.- हरिष भामरे, तहसीलदार पेठ.