शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव तालुक्यात मतदान प्रक्रिया शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 01:10 IST

मालेगाव : तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या मतदान प्रक्रिया किरकोळ वाद वगळता शांततेत व सुरळीत पार पडली. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६६.६८ टक्के मतदान झाले होते. साडेपाच वाजेच्या आत मतदान केंद्रात दाखल झालेल्या तालुक्यातील टेहरे, चंदनपुरी, रावळगाव, झोडगे, येसगाव खुर्द येथील मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती, तर बहुतांश गावांची मतदान यंत्रे पोलीस बंदोबस्तात येथील तहसील कार्यालयाच्या स्ट्रँग रूममध्ये ठेवण्यात आली आहेत. रूमबाहेर सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

तालुक्यातील टेहरे येथील मतदान केंद्र क्रमांक प्रभाग २ व ३ मध्ये मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती. लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याबाबत तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांच्याकडे तक्रार दाखल केल्यानंतर त्यांनी केंद्राची पाहणी केली व दोन्ही केंद्रांत प्रत्येकी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती केली होती. तालुक्यातील टेहरे, चंदनपुरी, निमगाव येथील दोन गटांमधील किरकोळ वाद वगळता तालुक्यात मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली. तहसीलदार चंद्रजीत राजपूत, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते.तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींचे ३१७ प्रभागातील ७५९ जागांसाठी निवडणूक रिंगणात उभे असलेल्या १ हजार ६८४ उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी मतदान यंत्रात बंद झाले आहे. सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. कोरोनाची भीती दूर करीत मतदारांनी निर्भयपणे मतदान केले. तालुक्यातील येसगाव बु।। केंद्रावरील केंद्र क्रमांक ३ मधील मतदान यंत्राची बॅटरी बंद पडल्याने काही वेळ यंत्र बंद पडले होते. कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेऊन त्या ठिकाणावरील मतदान यंत्र पूर्ववत सुरळीत केले.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत