शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील  ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 01:26 IST

जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी रविवारी (दि. २७) शांततेत मतदान झाले. सकाळ पासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्याचे चित्र दिसून आले.

नाशिक : जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी रविवारी (दि. २७) शांततेत मतदान झाले. सकाळ पासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्याचे चित्र दिसून आले. सटाणा : तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकूण ६९.२० टक्के सरासरी मतदान झाले. मतदान केंद्रांवर मतदारांची सकाळपासुनच गर्दी केली होती. सकाळी ११ वाजे पर्यंत २८ टक्के मतदान झाले होते. दुपारी २ ते ३ वाजे पर्यंत मतदान केंद्रांवर उन्हामुळे शुकशुकाट होता. दुपारी ३ वाजेपासून पुन्हा मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी किरकोळ बाचाबाची वगळता मतदान शांततेत पार पडले. केरसाणे ६२.८२ टक्के, भाक्षी ७३.१९ टक्के, मुळाणे ६८.०८ टक्के, केळझर ७४.९० टक्के याप्रमाणे मतदान झाले.कळवण : तालुक्यातील देसगाव, सरलेदिगर, खडकी, कोसवन, करंभेळ येथील ग्रामपंचायतच्या निवडणुकीत ८२.६० टक्के मतदान झाले. खडकी येथे सर्वाधिक ९१.५६ टक्के मतदान झाले. देसगाव येथे १५९० पैकी १२९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत ८१.२६ टक्के मतदान केले. सरले दिगर येथे ७७.४८ टक्के मतदान झाले खडकी येथे ९१.५६ टक्के मतदान झाले. कोसवन येथे १३३१ मतदारांपैकी १०८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत ८१.५२ टक्के मतदान केले. करंभेळ येथे ८४.९३ टक्के मतदान केले. देसगाव येथे थेट सरपंचपदासाठी चौरंगी लढत होत असून ६ जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित ३ जागांसाठी ८ उमेदवारांनी निवडणूक लढवली.सरलेदिगर येथे सरपंचपदासाठी तिरंगी लढत असून ४ जागा बिनविरोध झाल्या आहेत. एका जागेसाठी दुरंगी लढत होत आहे.खडकी येथे सरपंचपदासाठी दुरंगी लढत होत असून एक जागा बिनविरोध झाली आहे. ७ जागांसाठी १४ उमेदवारांनी निवडणूक लढवली. करंभेळ येथे सरपंचपदासाठी तिरंगी लढत असून ६ जागा बिनविरोध झाल्या आहेत. एका जागेसाठी दुरंगी लढत झाली. कोसवन येथे सरपंचपदासाठी तिरंगी लढत असून ४ जागा बिनविरोध झाल्या आहेत. ५ जागांसाठी ९ उमेदवारांनी निवडणूक लढवली.देवळ्यात तीन ग्रामपंचायतींसाठी मतदानदेवळा : तालुक्यातील मेशी, माळवाडी व फुलेमाळवाडी या तीन ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवार मतदान झाले. मेशी ८३ टक्के, माळवाडी ८५.१५ टक्के तर फुलेमाळवाडी ८७.१२ टक्के, मतदान झाले. थेट सरपंचपदासाठी होणाऱ्या या निवडणुकीत सरपंचपदासाठी मेशीत ३, माळवाडी ३ तर फुलेमाळवाडीत २ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ग्रा.पं. सदस्यांच्या काही जागांची निवड बिनविरोध झाल्यामुळे १७ सदस्यांसाठी ३४ उमेदवारांनी निवडणूक लढवली. सोमवार दि. २७ रोजी मतमोजणी होणार आहे. सिन्नर तालुक्यातील सोमठाण येथे २ जागासाठी तर दापुरला एका जागेसाठी शांततेत मतदान पार पडले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक