शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

विद्यार्थ्यांमार्फत मतदान जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 00:48 IST

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९च्या पूर्वतयारीसाठी जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्ह्यातील शालेय, माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमार्फत पालकांना प्रश्न मंजूषाद्वारे निवडणुकीबाबत मतदार यादी, विधानसभा मतदारसंघ, नावातील बदल, नवमतदाराचा मतदार यादीत समावेश तसेच मृत व्यक्तीचे नाव यादीतून वगळणे अशा स्वरुपाचे प्रश्न असणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सूरज मांढरे यांनी दिली़

ठळक मुद्देजिल्हाधिकारी सूरज मांढरे : सुलभ निवडणुका व्यवस्थापन समितीच्या बैठकीत निर्णय

नाशिक : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९च्या पूर्वतयारीसाठी जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्ह्यातील शालेय, माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमार्फत पालकांना प्रश्न मंजूषाद्वारे निवडणुकीबाबत मतदार यादी, विधानसभा मतदारसंघ, नावातील बदल, नवमतदाराचा मतदार यादीत समावेश तसेच मृत व्यक्तीचे नाव यादीतून वगळणे अशा स्वरुपाचे प्रश्न असणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सूरज मांढरे यांनी दिली़जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २0१९ च्या मतदार जागृती आणि जिल्हा सुलभ निवडणुका व्यवस्थापन समितीच्या बैठकीत ते बोलत होते़ यावेळी समाज कल्याण सहायक आयुक्त प्राची वाजे, महानगरपालिका शिक्षणाधिकारी देवीदास महाजन अग्रणी बँक अधिकारी भरत बर्वे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुरेखा पाटील व विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़मांढरे म्हणाले, नाशिक जिल्ह्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक विद्यालये आणि महाविद्यालयांमध्ये साधारणत: सहा ते सात लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़ या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील साधारण पंचवीस लाख मतदारांपर्यंत पोहोचणे जिल्हा निवडणूक प्रशासनास शक्य होणार आहे़ त्यासोबतच नगरपालिका, सहकारी संस्था, विविध बँका, अंगणवाडी यांच्या माध्यमातूनही जिल्ह्यातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचून जिल्ह्यातील मयत मतदारांची नावे वगळण्याची मोहीम हाती घेण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले़विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपला मतदाराचा हक्क कर्तव्य म्हणून बजावून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी सूरज मांढरे यांनी केले़ उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी सादरीकरणाद्वारे स्वीप समितीच्या कामकाजाची माहिती दिली़ बैठकीच्या शेवटी निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार डॉ़ अमित पवार यांनी आभार मानले़नाम में क्या रखा है?जिल्ह्यातील सर्व दिव्यांग मतदारांचा शोध घेणे व दिव्यांग मतदारांची नोंदणी मतदार यादीमध्ये करून सर्व दिव्यांग मतदारांना आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सुलभ पद्धतीने मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे़४मतदार यादीचे शुद्धीकरण व दोषविरहित मतदार यादी तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे़ या मोहिमेचा एक भाग म्हणून नाम में क्या रखा है? हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले़

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयElectionनिवडणूक