शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
3
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
4
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
6
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
7
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
8
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
9
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
10
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
11
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
12
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
13
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
14
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
15
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
16
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
17
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
18
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
19
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...

२० जानेवारीला मतदान : बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न

By admin | Updated: December 27, 2014 00:46 IST

येवला औद्योगिक वसाहतीची निवडणूक

 येवला : येवला औद्योगिक सहकारी वसाहतीची बहुचर्चित पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सभासदांची बैठक आमदार छगन भुजबळ यांनी बोलावून संचालक मंडळाची सहमतीने बिनविरोध निवड व्हावी यासाठी विशेष प्रयत्न केल्याने बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.औद्योगिक सहकारी वसाहतीचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्र म जाहीर झाला असून, २० जानेवारी २०१५ रोजी मतदान व मतमोजणी केली जाणार आहे. औद्योगिक वसाहतीचे संस्थापक रमेशचंद्र पटेल यांनी १९८३ मध्ये स्थापन केलेल्या वसाहतीत २००८ साली झालेल्या निवडणुकीनंतर तत्कालीन संचालक मंडळावर विविध आरोप लागून संचालक मंडळ बरखास्त झाले होते. यांनतर विक्रम गायकवाड, श्याम कंदलकर, सुकृत पाटील यांची प्रशासक मंडळावर नियुक्ती करण्यात आली होती. २ एप्रिल २०११ पासून संचालक मंडळाने कारभार हाती घेतला व तब्बल तीन वर्षे व आठ महिने प्रशासकीय कारकीर्द चालली. नुकत्याच जाहीर झालेल्या निवडणूक प्रक्रीयेतून १३ संचालक निवडले जाणार आहे. यामध्ये कारखानदार गट ७, महिला गट २ तर सोसायटी गट, इतर मागासवर्र्ग, अनुसूचित जाती जमाती, भटक्या विमुक्त जाती या चार गटातून प्रत्येकी १ संचालक असे एकूण १३ संचालकाची निवड होणार आहे. वसाहतीत कारखानदार गटातील २६, सोसायटी गटातील ४ तर इतर १४३ असे एकूण १७३ मतदारांचा समावेश यादीत आहे. दरम्यान शक्रवारी ११ वाजता आमदार छगन भुजबळ यांनी अ‍ॅड . माणिकराव शिंदे यांच्या समवेत वसाहतीच्या सभासदांची बैठक घेऊन, उपस्थित सभासदाचा परिचय करून घेतला व बिनविरोध निवडणूक पार पाडण्याचे आवाहन केले. निवडणुकीचा खर्च वसाहतीला परवडणार नाही, सामोपचाराने आणि सहमतीने विकासाचा अजेंडा पुढे नेऊ असे आवाहन उपस्थितांना केले. कारखानदार गटातून विक्रम गायकवाड, शाम कंदलकर, सुहास अलगट, विष्णू खैरनार, तुळशीदास पटेल, सौ. जैन, सुरेश परदेशी, सोसायटी गटातून आमदार पंकज भुजबळ, महिला गटातून सौ. पाटील व सौ. काबरा अनुसूचित जाती जमाती गटातून योगेंद्र वाघ, भटके विमुक्त जाती जमाती गटातून अ‍ॅड. नवीनचंद्र परदेशी, इतर मागासवर्गीय गटातून अनिल कुक्कर यांच्या नावाबाबत सहमती झाल्याची अधिकृत सूत्रांची माहिती आहे. या चर्चेनंतर व्यक्तीश: औद्योगिक वसाहतीच्या सभासदांचे म्हणणेही भुजबळ यांनी ऐकले.