येवला : शहरात घरोघरी जाऊन नेमलेले मतदान क्षेत्रीय अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मतदार चिठ्ठी वाटण्याचे काम सुरू केले आहे. येवला पालिकेने दिवसभर गावातून ध्वनिक्षेपकाद्वारे मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. येवला पालिकेत मतदार जागृती अभियान यशस्वी करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेत मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी बीएलओ यांना मोहीम कशी प्रभावीपणे राबवावी याबाबत मार्गदर्शन केले.
येवला शहरात मतदार चिठ्ठीवाटप
By admin | Updated: October 6, 2014 00:14 IST