शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

स्थानिकपेक्षा राष्टय मुद्द्यांनाच मतदारांनी दिले प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 01:02 IST

मोदी लाटेवर स्वार झाला तो विजयी झाला, अशी चर्चा प्रारंभीपासूनच येवला विधानसभा मतदारसंघात असल्याने उमेदवार कोण आहे? हे गौण ठरणार हा होरा खरा ठरला आणि भारती पवार यांच्या रूपाने दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे कायम राखण्यात भाजप यशस्वी ठरला.

मोदी लाटेवर स्वार झाला तो विजयी झाला, अशी चर्चा प्रारंभीपासूनच येवला विधानसभा मतदारसंघात असल्याने उमेदवार कोण आहे? हे गौण ठरणार हा होरा खरा ठरला आणि भारती पवार यांच्या रूपाने दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे कायम राखण्यात भाजप यशस्वी ठरला.उमेदवार बदलला तरी मोदींच्या नावाने मते मागत भाजपने वातावरण निर्मिती केली. राष्ट्रीय सुरक्षा आणि सर्जिकल स्ट्राइक, पुलवामा चढाई या मुद्द्यांमुळे तरुण आणि सुशिक्षित मतदार भाजपकडे आकर्षिला गेला. शेतकऱ्यांनीदेखील देशाची सुरक्षा आणि मोदी फॅक्टर हे समीकरण महत्त्वाचे मानले. राष्टÑवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांनी उमेदवार आयात केलेले असल्यामुळे या निवडणुकीत पक्षनिष्ठेचा मुद्दा चर्चेला आलाच नाही. येवलेकरांच्या जिव्हाळ्याचा असलेला मांजरपाडा प्रकल्प, नोटाबंदी व जीएसटी, बेरोजगारी या मुद्द्यांपेक्षा देशाच्या संरक्षणाच्या मुद्द्याला मतदारांनी अधिक प्राधान्य दिल्याचे या निकालावरून दिसून येत आहे.येवला विधानसभा मतदारसंघात येवला शहर पूर्वीपासून जनसंघाचे म्हणून ओळखले जाते. भाजपला मानणारा निश्चित असा मतदार शहरात आहे. घरच्या भाकरी खाऊन राबणारी कार्यकर्त्यांची फळी आहे. परंतु ही फळी लोकसभेएवढी विधानसभेत फारशी सक्रिय नसते. ही फळी सक्रिय झाली तर विधानसभेचे चित्रदेखील बदलू शकते. सन २०१५च्या विधानसभा निवडणुकीनंतर येवल्याचा राजकीय रंग काहीसा बदलला आहे. गेल्या विधानसभेला भुजबळांच्या पाठीशी सारे नेते एकवटलेले होते. आता दोन्ही दराडे बंधू सेनेचे आमदार आहेत. किशोर दराडे यांच्याकडे भाजपचे निवडणूक नियोजन होते. आगामी विधानसभा या पद्धतीने लढली गेली तर निश्चितच युतीसाठी सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या निकालाचा पुढील विधानसभेवर काय परिणामप्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येवल्यात सभा घेऊन भुजबळ यांना जाहीर आव्हान दिले. असेच आव्हान आगामी विधानसभा निवडणुकीत फडणवीस देतील काय? यावर विधानसभेची लढत अवलंबून राहील. यंदा स्थानिक पातळीवरील नेते मनापासून प्रचाराला उतरलेच नाही. विधानसभेला या नेत्यांची काय भूमिका असणार? यावरदेखील विधानसभेची मदार अवलंबून असणार आहे. हा मदतदारसंघ युतीत सेनेच्या वाट्याला असला तरी भाजप-सेनेचे वरिष्ठ नेते आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा राबता असला तर त्याचा परिणाम युतीच्या बाजूने निश्चित होऊ शकतो.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालdindori-pcदिंडोरी