शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
4
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
5
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
6
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
7
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
8
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
9
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
10
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
11
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
12
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
13
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
14
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
15
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
16
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
17
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
18
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
19
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
20
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?

मतदार याद्यांमध्ये घोळ

By admin | Updated: January 10, 2017 01:16 IST

महानगरपालिका निवडणूक : गुरुवारी मतदार यादी प्रसिद्ध

नाशिक : फेबु्रवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी मतदार याद्यांवर अंतिम हात फिरविण्याची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू असली तरी मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त होत आहेत. येत्या गुरुवारी (दि.१२) मतदार याद्या प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर दि. १७ जानेवारीपर्यंत हरकती मागविल्या जाणार आहेत. त्यामुळे महापालिकेकडे हरकतींचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.महापालिका निवडणुकीसाठी मतदार याद्यांचे नवीन प्रभागांनुसार विभाजन करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या गुरुवारी (दि.१२) मतदार याद्या महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाणार असून, राजीव गांधी भवनमधील मुख्यालयासह सहाही विभागीय कार्यालयात मतदार याद्या पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानंतर दि. १२ ते १७ जानेवारी या कालावधीत मतदार याद्यांसंबंधी हरकती व सूचना मागविल्या जाऊन दि. २१ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दरम्यान, प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ असल्याच्या तक्रारी महापालिका प्रशासनाकडे प्राप्त होत आहेत. प्रामुख्याने, मतदार याद्यांचे विभाजन करताना अनेकांचा रहिवास एका प्रभागात तर मतदार यादीत नाव दुसऱ्या प्रभागात दर्शविण्यात आले आहे. काही प्रभागात तर २० हजारांहून अधिक मतदारांची नावे स्थलांतरित करण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. याशिवाय, काही मतदारांची केवळ आडनावेच देण्यात आली आहेत. काही प्रभागात मध्येच अनेक मतदारांची नावे गायब केल्याच्याही तक्रारी आहेत, तर अनेकांचे नाव विधानसभा मतदारसंघाच्या यादीत असताना महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीत नसल्याचा आरोप होत आहे. मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर घोळ दिसून येत असल्याने विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांचे धाबे दणाणले असून, मतदार याद्या दुरुस्तीसाठी महापालिकेत चकरा वाढल्या आहेत.