सिन्नर : तालुक्यातल्या दत्तनगर (पालवेवाडी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामपंचायतीच्या मतदार जागृती अभियान राबविण्यात आले. ‘आम्ही दोघे भाऊ, मतदानाला जाऊ’, ‘सर्वश्रेष्ठ दान, मतदान’, ‘एकच राजा, मतदार राजा’, ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’, ‘मतदान करु, लोकशाही तारु’ आदि घोषणा यावेळी देण्यात आल्या. याप्रसंगी सरपंच शकुंतला पालवे, उपसरपंच नामदेव पालवे आदिंसह विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
दत्तनगर येथे मतदार जागृती अभियान
By admin | Updated: October 3, 2014 01:11 IST