शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

शंभर ग्रामपंचायतींच्या मतदारयाद्या जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 01:04 IST

नांदूरशिंगोटे : सर्वाधिक चुरशीने लढल्या जाणाऱ्या आणि गावगाड्याशी जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या रणधुमाळीस प्रारंभ झाला आहे. निवडणूक आयोगाने सिन्नर तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदारयाद्या जाहीर केल्या आहेत. त्यानुसार दि. १ डिसेंबरला प्रारूप मतदार याद्या तालुक्यातील गावोगावी प्रसिद्ध झाल्या आहेत.

ठळक मुद्देसिन्नर तालुका : ७ डिसेंबरपर्यंत हरकती घेण्याची मुदत

नांदूरशिंगोटे : सर्वाधिक चुरशीने लढल्या जाणाऱ्या आणि गावगाड्याशी जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या रणधुमाळीस प्रारंभ झाला आहे. निवडणूक आयोगाने सिन्नर तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदारयाद्या जाहीर केल्या आहेत. त्यानुसार दि. १ डिसेंबरला प्रारूप मतदार याद्या तालुक्यातील गावोगावी प्रसिद्ध झाल्या आहेत.गेल्या आठ महिन्यांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या नाहीत. फेब्रुवारीमध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला होता, मात्र कोरोनामुळे तोही रद्द करण्यात आला. त्यामुळे आता जून ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली असून, त्यासाठी दि. २० नोव्हेंबर रोजी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. १ ते १० डिसेंबरदरम्यान मतदार यादीवर हरकती दुरुस्त होऊन १० डिसेंबर रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. त्या यादीवरच आगामी ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत. दि. २५ सप्टेंबर २०२० रोजीची मतदान यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तहसील कार्यालयाच्या निवडणूक शाखेने मंगळवारी (दि.१) ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय आणि तहसील कार्यालयात प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केली. या यादीवर मतदारांना १ ते ७ डिसेंबर या सात दिवसांच्या कालावधीत हरकती आणि सूचना दाखल करता येणार आहेत.दरम्यान, सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाने नवीन मतदार नोंदणीचा कार्यक्रम हाती घेतला असून, ही यादी दि. १५ जानेवारी २०२१ रोजी अंतिम होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीशी तिचा काहीएक संबंध नसल्याचे तहसीलदार राहुल कोताडे यांनी स्पष्ट केले आहे. याउलट ग्रामपंचायत निवडणुकीसाठीची मतदारयादी मात्र १० डिसेंबर रोजी अंतिम केली जाणार आहे. १ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादीवर मतदारांच्या हरकती असल्यास त्या लेखी स्वरूपात ग्रामपंचायत कार्यालय किंवा तहसील कार्यालय सिन्नर येथे मतदारांना सादर करता येणार असल्याचे तहसीलदार कोताडे यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर वर्षाच्या अखेरीस किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक