नाशिक : मतदान करा, लोकशाही बळकट करा, मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा आधार हो अशा विविध घोषणांनी जिल्ह्यातील अनेक गावांचा परिसर दणाणून गेला निमित्त होते मतदार जागृती रॅलीचे .आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्व भूमीवर प्रशासनातर्फे मतदार जागृती करण्यात येत आहे. यानिमित्त जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयांतर्फे ठिकठिकाणी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी विविध घोषणा दिल्या.येवला : पाटोदा येथे विविध शाळामधील विद्यार्थ्यांच्या सहभागाने मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. प्रारंभी येथील मुख्य मैदानावर विविध शाळेचे विद्यार्थी व शिक्षक एकत्रित जमले. त्यानंतर तहसीलदार नरेशकुमार बहीरम यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली. पाटोदा प्रमुख मार्गावरून व बाजारातून रॅली काढण्यात आली. येथील मुख्य चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅली दरम्यान ‘मतदार राजा जागा हो, प्रगतीचा धागा हो’, ‘लोकशाही बळकटीकरणासाठी सर्वाचा सहभाग’, ‘एकच लक्ष मताचा हक्क’ मतदान हा हक्क तसेच कर्तव्य आहे अशा विविध घोषणा देऊन विद्यार्थ्यांनी १८ वर्षांवरील मतदारांमध्ये मतदानाच्या जागृती केली. विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. पथनाट्यात सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना तहसीलदार बहीरम यांनी बैठक घेवून मतदार जागृतीबाबत प्रबोधन करण्याचे आवाहन केले.. याप्रसंगी बोलताना तहसीलदार बहीरम यांनी सांगितले कि लोकशाहीच्या प्रगल्भतेसाठी मतदान आवश्यक असून, लोकशाही अधिकाधिक विकिसत व्हावी, यासाठी मतदानाचा मूलभूत हक्क नागरिकांनी बजावायलाच हवा.लासलगाव : लासलगाव महाविद्यालयातर्फे ‘‘मतदार जागृती अभियान’’ लासलगाव : येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी कल्याण मंडळांतर्गत मतदार जागृती रॅली काढण्यात आली. रॅलीचे उद्घाटन जयदत्त होळकर यांच्या हस्ते व संस्थेचे जनरल सेक्र ेटरी गोविंदराव होळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. प्रास्तविकात विद्यार्थी कल्याण मंडळ अधिकारी प्रा. भूषण हिरे यांनी मतदानाचा पवित्र अधिकार बजवला पाहिजे असे सांगितले. जयदत्त होळकर यांनी उद्घाटनपर भाषणात आपण जर चांगल्या नेत्याची अपेक्षा करणार असाल तर सर्व प्रथम आपण आपला मताचा अधिकार गाजविणे हे आपले कर्तव्य आहे. असे सांगितले. तहसीलदार डॉ. विनोद भामरे म्हणाले देशाच्या विकासात सुज्ञ मतदाराची भूमिका महत्वाची ठरते. त्यामुळे या रॅलीतून केल्या जाणाऱ्या मतदार जागृतीच्या आवाहनाला नागरिकांनी साथ द्यावी असे अवाहन केले. प्राचार्य डॉ. दिनेश नाईक यांनी मतदारासाठीची प्रतिज्ञा सर्व उपस्थितांना दिली. रॅलीचा प्रारंभ महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून झाला. (लोकमत चमू)१अभोणा : डांग सेवा मंडळ संचिलत येथील कनिष्ठ महाविद्यालयात मतदार जागृती रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी मतदान करा , लोकशाही बळकट करा, मतदार राजा जागा हो,लोकशाहीचा आधार हो अशा घोषणा देत संपूर्ण गावातून जागृती केली. उपमुख्याध्यापक प्रशांत कोष्टी,प्रा किरण सूर्यवंशी, प्रा नरहर जाधव यांनी मार्गदर्शन केले यावेळी उपप्राचार्य यशवंत कुलकर्णी शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.खामखेडा : मतदान करणे हा पवित्र हक्क असून , लोकशाही व आपला भारत देश सक्षम,बळकट ,विकसनशील करण्यासाठी प्रत्येकाने मतदान नोंदणी करु न लोकशाहीवर निष्ठा ठेवणे गरजेचे आहे ,असे प्रतिपादन मुख्याध्यापक एस टी महीरे यांनी राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्र माच्या प्रसंगी काढले देवळा तालुक्यातील खामखेडा येथील जनता विद्यालय व जिल्हा परिषद शाळा यांच्या सयुक्त विद्यमाने मतदार दिनानिमित्त प्रभात फेरी काढण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन मुख्याध्यापक एस टी महीरे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी व मतदानाच्या हक्कासाठी घोषणा दिल्या. यावेळी शिक्षक एच एस निकम, युवराज दाणी, ठाकरे ,कोर यांनी चौक सभा घेऊन नागरिकांना मतदार नोंदणी व मतदानाच्या हक्क याबाबत मार्गदर्शन केले.३घोटी : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जनता विद्यालयातर्फे जनजागृती रॅली काढण्यात आली. घोटी मेनरोडहून सुरूवात करून जैन मंदिर , सिन्नर फाटा अशा विविध भागातून विद्यार्थ्यांनी घोषणा देऊन मतदारांचे लक्ष वेधून उदबोधन केले. शालेय मैदानात विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्व पटवून देतांना विद्यालयाचे प्राचार्य एच एस अहीरे यांनी लोकशाहीची व्याख्या समजावून सांगीतली . प्रत्यक्ष मतदार व मतदानाची टक्केवारी यामधील तफावत व सुशिक्षित मतदारांची मतदानाची उदासिनता ही सक्षम लोकशाहीसाठी घातक असून अशा समाजामुळे लोकशाही धोक्यात येते की काय ? असे वाटायला लागले आहे. मतदान करतांना कुठल्याही आमिषाला बळी पडू नका जात धर्म पंथ विचार न करता मतदान करा. व मतदानाचा हक्क बजवा असे मार्गदर्शन केले. इगतपुरीचे तहसिलदार अनिल पुरे , नायब तहसिलदार शिंदे ेयांच्याहस्ते मतदान ओळखपत्र वाटप यावेळी करण्यात आले. कार्यक्र म यशस्वितेसाठी पर्यवेक्षक शिवाजी देवरे यांनी विशेष श्रम घेतले. बी के जाधव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी दत्ता वाघे पाटील, वंदना जाधव ,सुधीर काळे, सुहास रनाळकर, शेख गुलाम दस्तगीर ,प्रमोद कांगुणे, प्रकाश तांबे, आदी उपस्थित होते.
मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा आधार हो!
By admin | Updated: January 31, 2017 01:11 IST