शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

मतदार जागृती : विद्यार्थ्यांचे तपासणार सामान्यज्ञान निवडणूक आयोग घेणार परीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:27 IST

निवडणूक प्रक्रिया व मतदानाच्या पद्धतीसह एकूणच भारतीय समाजशास्त्राविषयी विद्यार्थ्यांना कितपत ज्ञान आहे हे तपासण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने इयत्ता सातवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्दे निर्णयामुळे मतदार जागृतीला हातभारमतदार जागृती मोहीम हातीअनेक प्रकारचे प्रश्न परीक्षेत

नाशिक : निवडणूक प्रक्रिया व मतदानाच्या पद्धतीसह एकूणच भारतीय समाजशास्त्राविषयी विद्यार्थ्यांना कितपत ज्ञान आहे हे तपासण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने इयत्ता सातवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असून, येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत तालुका पातळीवर परीक्षा घेतल्यानंतर जिल्हास्तरीय उत्तीर्ण निवडण्यात येणार आहेत. आयोगाच्या या नवीन निर्णयामुळे मतदार जागृतीला हातभार लागण्यास मदत होणार आहे.निवडणूक आयोगाने गेल्या काही वर्षांपासून मतदार जागृती मोहीम हाती घेतली असून, मतदानाचा टक्का वाढून लोकशाही अधिक सृदृढ करण्यासाठी मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती महत्त्वाची असल्याचे ओळखून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून आता वयाच्या अठरा वर्षाच्या उंबरठ्यावर असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मतदान प्रक्रिया, निवडणूक पद्धती, निवडणूक आयोग याबाबत आकर्षण निर्माण होण्यासाठी सामान्यज्ञान चाचणी परीक्षा घेणाचे ठरविले आहे. साधारणत: १४ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांना त्यासाठी परीक्षार्थी ठरविण्यात आले आहे. या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्नपत्रिका असणार आहे. त्यासाठी ३९ प्रश्न आयोगाने निश्चित केले आहेत. मात्र स्थानिक पातळीवर त्यात निवडणुकीसंदर्भात आणखी काही प्रश्न यंत्रणेला आवश्यक वाटत असतील तर प्रश्नांची संख्या वाढविण्याची मुभा देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे समाजशास्त्राबाबतचे ज्ञान जाणून घेणाºया प्रश्नांचा या प्रश्नपत्रिकेत समावेश आहे. मतदार नोंदणीसाठी किती वय असावे, त्यासाठी कोणता अर्ज भरावा, भारतात कोणती मतदान पद्धती आहे, ईव्हीएमचा पूर्ण अर्थ काय, मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत, किती वर्षे वयोगटातील व्यक्ती उमेदवारी करू शकतो, लोकसभेची निवडणूक किती वर्षांनी, राज्यसभेची निवडणूक किती वर्षांनंतर होते असे अनेक प्रकारचे प्रश्न या परीक्षेत विचारण्यात येणार आहेत.