शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आझाद मैदानावर घुमला नाशिककरांचा आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:31 IST

नाशिक : मुंबईतील आझाद मैदानावर सकल मराठा समाजातर्फे सुरू असलेल्या आंदोलनात नाशिकमधून मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांसह विविध संघटनांचे ...

नाशिक : मुंबईतील आझाद मैदानावर सकल मराठा समाजातर्फे सुरू असलेल्या आंदोलनात नाशिकमधून मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांसह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवत एसईबीसी प्रवर्गातून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाजी केली.

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्य सरकारकडून एसईबीसी प्रवर्गातून विविध स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यास दिरंगाई केली जात असल्याचा आरोप मराठा संघटनांकडून केला जात असून, अशा उमेदवारांना त्यांनी उत्तीर्ण केलेल्या स्पर्धा परीक्षांनंतर शासकीय नोकरीत सामाविष्ट करण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करीत आहेत. त्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी नाशिकमधून मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांसह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रविवारीच मुंबईत पोहोचले होते. तर सोमवारी सकाळी मुंबईच्या दिशेने निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी रस्त्यातच अडविल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केला आहे. दरम्यान, मुंबईत पोहोचलेल्या आंदोलकांनी राज्याील आमदारांसह विरोधी पक्ष नेत्यांना सभागृहात नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठा उमेदवारांच्या प्रश्नावर आवाज उठविण्याचे आवाहन केले आहे. विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून पात्र ठरलेल्या आणि नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठा उमेदवारांचा प्रश्‍न राज्य सरकारने मार्गी लावला नाही, तर मराठा समाज यापुढे आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घेईल, असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिला आहे. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकमधून मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर, आशिष हिरे, नवनाथ शिंदे, विजय खर्जुल, अस्मिता देशमाने, पूजा धुमाळ, माधवी पाटील, किरण बोरसे, भारत पिंगळे, वैभव दळवी, प्रवीण घोडे, योगेश गांगुर्डे, योगेश पाटील, दिनेश खडतरे, दुर्गेश कामतेकर, रमेश पांडे आदींनी मुंबईत दाखल होत या आंदोलनात सहभाग घेतला आहे.

इन्फो

राज्य सरकारने सारथी शिक्षणसंस्था, अण्णासाहेब पाटील महामंडळ, कोपर्डीच्या भगिनीला न्याय यासारख्या मराठा समाजाच्या अनेक प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मराठा समाजामध्ये राज्य सरकार विरोधात प्रचंड रोष निर्माण होत आहे. आता सरकार न्यायाची भूमिका घेत नसेल तर मराठा बांधवांच्या भावनांचा होणारा उद्रेक हा असह्य असेल. येत्या दोन दिवसांमध्ये राज्य सरकारने मराठा उमेदवारांचे सोडवावेत.

- करण गायकर, राज्य समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा

(फोटो- १४मराठा रिजर्वेशन) मुंबईतील आझाद मैदनावर नियुक्तीच्या प्रतीक्षेतील मराठा उमेदवारांच्या आंदोलनात सहभागी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर, आशिष हिरे, नवनाथ शिंदे ,विजय खर्जुल, अस्मिता देशमाने, पूजा धुमाळ, माधवी पाटील, किरण बोरसे, भारत पिंगळे, वैभव दळवी, प्रवीण घोडे, योगेश गांगुर्डे, योगेश पाटील, दिनेश खडतरे, दुर्गेश कामतेकर, रमेश पांडे आदी.