नाशिक : मतदार जागृती अभियानाअंतर्गत क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यात विविध स्पर्धांचे बुधवार, दि़ ८ पासून आयोजन करण्यात आले आहे़ मतदारांच्या जागृतीसाठी प्रथमच क्रीडा विभागाकडून असा उपक्रम राबविला जात आहे़ विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा यासाठी नागरिकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न या स्पर्धांमधून करण्यात येणार आहे़ या उपक्रमाअंतर्गत केंद्र, तालुका व जिल्हा अशा तीन स्तरांवर स्पर्धा होणार आहेत़ यामध्ये कबड्डी, क्रॉसकंट्री या मैदानी स्पर्धांसह निबंध, रंगभरण या स्पर्धाही होणार आहेत़ केंद्र स्तरावरील स्पर्धांना बुधवारी प्रारंभ होणार आहे़ केंद्र शाळांमध्ये याचे आयोजन करण्यात येणार आहे़ यातील विजेत्यांची तालुकास्तरावर शुक्रवारी (दि़ १०) स्पर्धा होणार आहे़ यातील विजेत्यांची जिल्हास्तरावर स्पर्धा होणार आहे़
मतदारांच्या जागृतीसाठी उपक्रम
By admin | Updated: October 7, 2014 01:52 IST