शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

विवेकानंद मैदान बनले अनधिकृत वाहनतळ

By admin | Updated: April 18, 2016 00:03 IST

प्रभाग ४३ : हातगाडी व्यावसायिकांचीही वाढली गर्दी

 सिडको : येथील प्रभाग ४३ मधील स्वामी विवेकानंदनगर येथील मोकळ्या मैदानावर गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृत पार्किंगचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या भूखंडाला संरक्षण भिंत बांधण्याचा प्रश्न अजूनही रेंगाळल्यामुळे मैदानाचा वापर अनधिकृत पार्किंगसाठी होत आहे. याप्रकरणी नागरिकांनी आयुक्तांनादेखील निवेदन दिले असून, संरक्षण भिंतीची मागणी केली आहे. स्वामी विवेकानंदनगर मोकळे मैदानास संरक्षक भिंत नसल्याने मैदानाचा वापर हा वाहने पार्किंगसाठी होत आहे. तसेच मैदानालगत सायंकाळच्या सुमारास हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांचाही वावर दिसून येत आहे. यात दिवसेंदिवस भर पडत आहे. स्वामी विवेकानंदनगर येथील मैदान हे सिडको प्रशासनाच्या ताब्यात आहे. सहावी योजना हस्तांतरित करताना सिडको सदरची जागा मनपाकडे हस्तांतरित करणार असल्याचे समजते. परंतु आज या मैदानाची देखभालअभावी दुरवस्था झाली आहे. मैदानाच्या चोहोबाजूने वाहनपार्किंग केली जात असल्यामुळे अतिक्रमणाचाही मुद्दा पुढे आला आहे.दरम्यान, सदरच्या मैदानास संरक्षक भिंत बांधण्याबाबत सिडको आणि महापालिका यांच्यात एकमत होणे अपेक्षित आहे. तांत्रिक कारणांमुळे सिडकोच्या ताब्यातील या मैदानास संरक्षण भिंत करणे अद्याप शक्य झालेले नाही. सदर मैदानास मनपाच्या माध्यमातून संरक्षक भिंत उभारून त्याठिकाणी मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण करण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी आहे. दरम्यान, याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवकांनीदेखील मनपाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. (वार्ताहर)