शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सातपूरमध्ये विकासाच्या नावे बकालपणा

By admin | Updated: November 28, 2015 22:48 IST

नागरिकांचे उपोषण : महापालिका अधिकारी जबाबदार; चौकशीची मागणी

नाशिक : सातपूर विभागात महापालिकेकडून अतिक्रमणे, रस्ते, नासर्डी नदीची स्वच्छता, पथदीप, व्यायामशाळा, क्रीडांगणे आदिंबाबत केला जात असलेला विकासाचा दावा दिशाभूल करणारा असून, विकासाच्या नावे केवळ बकालपणाच केल्याचा आरोप करीत स्थानिक नागरिकांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. उपोषणात विभागातील सर्वच नगरसेवकांनी सहभागी होत, महापालिका आयुक्तांनी याबाबतची चौकशी करावी, अशी मागणी केली. सातपूर प्रभाग सभेत विविध विषय चर्चिले जात असताना स्थानिकांनी सर्व नगरसेवकांनी उपोषणात सहभागी होण्याची मागणी करीत विविध समस्यांकडे लक्ष वेधले. यावेळी प्रभाग सभापती उषा शेळके यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यामध्ये सातपूर-अबंड लिंक रोडला बेकायदेशीर अतिक्रमणे असताना अधिकारी केवळ त्याभागात फेरफटका मारतात. अधिकारी अर्थकारणात गुंतलेले असल्याने या भागातील अतिक्रमणे अजूनही ‘जसै थे’च आहेत. तसेच विभागातील रस्त्यांवर २००७ पासून केलेला खर्च संशयास्पद असून, याची आयुक्तांनी चौकशी करणे आवश्यक आहे. संपूर्ण विभागात ड्रेनेज लाइनची समस्या असून, त्यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. विभागातील बहुतेक पथदीप बंद असल्याने चोऱ्यांच्या घटना नियमित घडत आहेत. शिवाय या भागात घंडागाडीची समस्या असून, तीन ते चार दिवस घंडागाडी फिरकतच नसल्याच्या तक्रारी आहेत. उद्याने, क्रीडांगणे, व्यायामशाळा, सभागृह यांचीही दुरवस्था झाली आहे. त्यामुळे आयुक्तांनी यासर्वच विभागांच्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून नागरिकांना मूलभूत सुविधा करून द्याव्यात, अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली. दरम्यान, नागरिकांच्या उपोषणाला नगरसेवक दिनकर पाटील, लता पाटील, प्रकाश लोंढे, नंदिनी जाधव, उषा अहिरे, अमोल पाटील यांनी पाठिंबा दिला. उपोषणात लक्ष्मण जपे, भरत सोनवणे, रमेश येवले, प्रेमानंद ठाकरे, नवनाथ शिंदे, भिकन खाटीक, गणेश गायकवाड, शांताराम सोनवणे, नारायण पठारे, शिवाजी वडणे आदिंनी सहभाग घेतला होता. (प्रतिनिधी)सातपूरवासीयांच्या उपोषणात सहभागी झालेले प्रभाग सभापती उषा शेळके, नगरसेवक दिनकर पाटील, लता पाटील, प्रकाश लोंढे, नंदिनी जाधव, उषा अहिरे, अमोल पाटील आदि.