शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
3
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
4
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
5
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
6
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
7
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
8
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
9
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
10
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
12
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
13
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
14
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
15
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
16
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
17
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
18
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
19
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
20
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

पर्यटकांना मिळणार शुद्ध पाणी अन् विश्रांती

By admin | Updated: January 17, 2016 22:39 IST

नांदूरमधमेश्वर अभयारण्य : इको हट, जलशुद्धीकरण यंत्राची उभारणी

नाशिक : राष्ट्रीय पक्षी अभयारण्य म्हणून नावलौकिक प्राप्त असलेल्या नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यात असलेल्या तोकड्या सोयीसुविधांबाबत नेहमीच पर्यटकांकडून ओरड केली जात होती. त्यामुळे वनविभागाच्या वतीने सुमारे लाखो रुपयांचा निधी या ठिकाणी विविध विकासकामांसाठी उपलब्ध करून देण्यात आला असून, जलशुद्धीकरण यंत्र, विश्रांतीसाठी इको हट, पॅगोडे व भव्य आकर्षक स्वागत कमान उभारणीच्या कामांना अभयारण्याच्या परिसरात प्रारंभ झाला आहे.गोदावरी-कादवा नदीच्या संगमावर नांदूरमधमेश्वर धरणाच्या पाणथळ जागेवर हिवाळ्याची चाहूल लागताच दरवर्षी हजारो देशी व विदेशी स्थलांतरित पक्षी भूक भागविण्यासाठी येतात. पक्षिनिरीक्षणासाठी राज्यासह परराज्यांतूनही पक्षिप्रेमी मोठ्या संख्येने येथे हजेरी लावतात. येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होऊ नये, त्यांना पक्षिनिरीक्षण सुलभरीत्या करता यावे, यासाठी वनविभागाकडून विविध सोयीसुविधा पुरविण्यावर भर दिला जात आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांकडून प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य, निरीक्षण मनोरे, प्रसाधनगृहाच्या दुरवस्थेबाबत तक्रार केली जात होती. महिलांसाठी नवीन प्रसाधनगृहासह विश्रांतीसाठी दोन पॅगोडे व तीन इको हटची उभारणी करण्यात आली आहे. शुद्ध पिण्याचे पाणी पर्यटकांना उपलब्ध व्हावे, म्हणून जलशुद्धीकरण यंत्रणा येथे बसविण्यात आली आहे.