शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
2
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
3
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
4
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
5
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
6
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
7
'यापुढे हल्ल्याचा प्रयत्न जरी केला तर...', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
8
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”
9
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
10
बालपणीचे मित्र, इंदूरमधला कॅफे...राजाच्या हत्येसाठी राजने ३ मित्रांना कसं तयार केले?
11
जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले...
12
हनिमून ते राजाची हत्या...; मेघालय पोलिसांनी विचारलेल्या 'या' १३ प्रश्नांनी उडवली सोनमची झोप!
13
बाबो! बोल्ड फोटोज आणि व्हिडिओज विकून खुशीने कमावले तब्बल १० कोटी, म्हणाली...
14
MS धोनीसंदर्भात व्यक्त होताना शास्त्रींना आठवला 'पाकीटमार'; म्हणाले... (VIDEO)
15
सात जन्मांची साथ..., हत्या केल्यानंतर सोनमने राजाच्या अकाउंवरून शेअर केली अशी पोस्ट, पण ती एक चूक नडली, पोलिसांना आला संशय
16
खतरनाक! सोशल मीडियावर प्रसिद्ध होणं बेतलं १९ वर्षीय मुलीच्या जीवावर; काय आहे डस्टिंग चॅलेंज?
17
विजेच्या धक्क्याने बाप गेलाच, दोन्ही मुलं पाणी घेऊन आली अन् त्यांचेही आयुष्य संपलं!
18
तुरुंगात जाणार हे माहित होते, सोनम हत्येपर्यंत का गेली? राजापासून वेगळे होण्याचे हे सोपे मार्ग होते..., पण...
19
'सोनम रघुवंशी म्हणत होती बिझी आहे, त्याला समजलंच नाही...!'; राजा रघुवंशीच्या मित्रानं केला मोठा खुलासा
20
Jyeshtha Purnima 2025: यंदा ज्येष्ठ पौर्णिमा विभागून;धनसंपत्तीत वाढीसाठी बुधवारी करा 'हे' उपाय!

सिन्नरला शासनाला कांदामाळ भेट

By admin | Updated: August 24, 2016 22:11 IST

सिन्नरला शासनाला कांदामाळ भेट

 सिन्नर : कांदा पिकाला कवडीमोल भाव मिळत असताना शासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ सिन्नर तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयासमोर कांदाफेक आंदोलन करून शासनाला कांदामाळ भेट देण्यात आली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे तहसील कार्यालयासमोर कांदाफेक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाराम मुरकुटे, माजी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल, जिल्हा परिषद सदस्य अर्जुन बर्डे, राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे डॉ. विष्णू अत्रे, डी. डी. गोर्डे यांच्या नेतृत्त्वाखाली सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून शासनविरोधी घोषणा दिल्या. वारंवार रास्ता रोको आंदोलन करून व निवेदने देऊनही शासनाला जाग येत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. शासनाला कांदामाळ भेट देऊन निषेध नोंदविण्यात आला. यावेळी तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी युनूस शेख, रवींद्र जगताप, दीपक लहामगे, दगू भुजबळ, प्रवीण जगताप, कल्पना रेवगडे, सुदाम शिरसाट, संदीप शिंदे, संदीप दिघोळे, संजय काकड, सुदाम शिरसाट यांच्यासह राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)