शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पशु-प्राण्यासाठी पाण्याच्या कुंड्या दाण्याचे घरटे भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 18:35 IST

निफाड : येथील श्री शनैश्वर देवस्थान व ग्रामस्थांच्या वतीने श्री शनैश्वर जयंती निफाड येथे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी केली जाते. याहीवर्षी शनी जयंती २ ते ५ जून या दरम्यान साजरी केली जाणार आहे. मात्र या वर्षी जयंती साजरी करतांना भीषण दुष्काळाने होरपळणाऱ्या पशु-प्राण्यांसाठी मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करण्यात आला. व पाण्याच्या कुंड्या, पक्षासाठी धान्य घरटे, भेट देण्याच्या उपक्र माचा शुभारंभ करण्यात आला.

ठळक मुद्देनिफाड : दुष्काळामुळे होरपळ; शनैश्वर देवस्थान; ग्रामस्थांचा उपक्रम

निफाड : येथील श्री शनैश्वर देवस्थान व ग्रामस्थांच्या वतीने श्री शनैश्वर जयंती निफाड येथे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी केली जाते. याहीवर्षी शनी जयंती २ ते ५ जून या दरम्यान साजरी केली जाणार आहे. मात्र या वर्षी जयंती साजरी करतांना भीषण दुष्काळाने होरपळणाऱ्या पशु-प्राण्यांसाठी मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करण्यात आला. व पाण्याच्या कुंड्या, पक्षासाठी धान्य घरटे, भेट देण्याच्या उपक्र माचा शुभारंभ करण्यात आला.शनिवारी (दि.२५) येथील शनी चौकात या उपक्र माचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर वि. दा. व्यवहारे, येवला वन विभागाचे वन परिक्षेत्राधिकारी संजय भंडारी, विंचूरचे वनरक्षक विजय टेकणर, बोकडदरे येथील भारत माता आश्रमाचे स्वामी जनेश्वरजी महाराज, लोणजाई माता मंदिराचे माणिक शास्त्री, पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे, निफाडचे नगराध्यक्ष एकनाथ तळवाडे, नगरसेवक राजा शेलार, अनिल कुंदे, मुकुंद होळकर, आनंद बिवलकर, दिलीप कापसे, देवदत्त कापसे, जावेद शेख, सेनेचे शहरप्रमुख संजय कुंदे, प्रवीण कराड, संपत व्यवहारे, शिवाजी ढेपले, जया भटेवरा आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्र मात येवला तालुक्यातील राजापूर वन विभागातील, काळवीट व मोर यांच्यासाठी आण िनिफाड तालुक्यातील श्री क्षेत्र लोणजाई मातागड येथे पशु प्राण्यांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पाण्याच्या सिमेंटच्या मोठ्या कुंड्या आण िपक्षासाठी धान्याचे व पाण्याचे घरटे भेट देण्यात आले राजापूर वन विभागासाठी २० पाण्याच्या सिमेंटच्या मोठ्या कुंड्या तर श्री क्षेत्र लोणजाई मातागड परिसरासाठी १ व निफाड शहरासाठी १ पाण्याच्या सिमेंटच्या मोठ्या कुंड्या भेट देण्यात आल्या.त्याचप्रमाणे निफाड तालुक्यातील श्री क्षेत्र लोणजाई मातागड येथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलेल्या झाडांसाठी एका पाण्याच्या टँकरचा खर्च देण्यात आला. येवला वन विभागाचे वन परिक्षेत्रिधकारी संजय भंडारी यांनी या पाण्याच्या कुंड्या व घरटे स्वीकारले तर लोणजाई माता मंदिराचे माणकि शास्त्री यांनी पाण्याची कुंडी व घरटे स्वीकारली तर श्री क्षेत्र लोणजाई मातागड येथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलेल्या झाडांसाठी एका पाण्याच्या टँकरचा खर्चाचा धनादेश एकनाथ तळवाडे व सुभाष कर्डीले व यांच्या हस्ते माणकि शास्त्री व संजय शेवाळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.या कार्यक्र माचे प्रास्तविक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वि .दा. व्यवहारे यांनी केले प्रास्तविक करतांना व्यवहारे म्हणाले की श्री शनेश्वर देवस्थानच्या वतीने दरवर्षी अनेक सामाजिक उपक्र म राबविण्यात येतात त्याची माहिती देऊन या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने हा उपक्र म राबविण्यात आल्याचे सांगितले शनी जयंती साजरी करतांना दुष्काळाचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकणार्या पशुप्राण्यासाठी मदत करण्याचा निर्णय श्री शनैश्वर देवस्थान व निफाड ग्रामस्थ यांनी घेऊन एक सामाजिक कार्य केले आहे असे ते म्हणाले.संजय भंडारी आपल्या भाषणात म्हणाले की राजापूर वन विभागाच्या अंतर्गत ५५०० हेक्टर क्षेत्र येते मागे या क्षेत्रात १५०० ते १६०० काळवीट होते. मात्र या वन विभागात वनविभागाच्या वतीने २३ वन तळे करण्यात आले आहे. वन विभाग व विविध सामाजिक संस्था यांनी पाण्याच्या कुंड्याची सोय केल्याने आणि वन विभागाने २३ वन तळे ,पाणवठे उभारल्याने काळविटांची संख्या वाढून ती आता २५०० ते ३००० झाली आहे. चांगल्या कामाला समाजाची साथ मिळत असल्याने राजापूर वन क्षेत्रात उन्हाळ्यात पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत असल्याने पाण्यासाठी वणवण भटकताना वन्य प्राण्यांचे रस्त्यावर होणारे अपघात कमी झाले आहे. पाण्याच्या केल्या गेलेल्या सोयीमुळे या वन परिसरात वन्य प्राण्यांना सुरिक्षत वाटू लागले आहे. असे ते म्हणाले.याप्रसंगी स्वामी जनेश्वर महाराज, संजय शेवाळे , अनिल कुंदे, शिवाजी ढेपले आदी मान्यवरांची भाषणे झाली याप्रसंगी रमेश कापसे, दत्ता उगावकार, संपत धारराव, केशर रु णवाळ, रामदास व्यवहारे, सुभाष कर्डीले, रघुनाथ कुंदे, मधुकर कुंदे, सुधाकर कापसे, कैलास कुंदे, विजय बोरा, किरण बागमार, दिनेश बागमार, अभय सुराणा, राजेंद्र दायमा ,संजय धारराव आदींसह नागरिक उपस्थित होते. आभार एकनाथ तळवाडे यांनी मानले.