शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक, जालना, औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यांना देणार भेटी

By admin | Updated: May 20, 2015 23:54 IST

स्वच्छतागृहांची होणार तपासणी; केंद्राचे पथक राज्याच्या दौऱ्यावर

नाशिक : राज्यातील स्वच्छतागृहांच्या बांधकामांची पाहणी व तपासणी करण्यासाठी केंद्र सरकारचे दोन पथके २५ ते २८ मे दरम्यान राज्याच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात नाशिकसह अहमदनगर, औरंगाबाद व जालना या जिल्ह्यांतील स्वच्छतागृहांच्या बांधकामांची पाहणी व तपासणी हे पथक करणार आहे.यासंदर्भात महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने नाशिकसह वरील तीनही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तातडीचे पत्र पाठवून या दौऱ्यासंदर्भात माहिती दिली आहे. केंद्र सरकारचे मानव संसाधन विभागाचे उपसचिव विरेंद्र सिंग यांच्या ३० एप्रिल २०१५च्या पत्रानुसार राज्यातील स्वच्छतागृहांच्या बांधकामांची पाहणी करण्यासाठी उपसचिव श्रीमती अनामिका सिंग, मुख्य सल्लागार सुनिशा अहुजा ही द्विसदस्यीय समिती २५ ते २८ मे दरम्यान या चारही जिल्ह्यांच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यासाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियानाचे मुख्य अभियंता सुभाषचंद्र दक्षित, कार्यकारी अभियंता राजेंद्र शहाडे, उपअभियंता योगेश बोराडे, प्रकल्प अभियंता अमोल पोतदार प्रकल्प संचालक महेश करजगावकर आदिंना समन्वयक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. २५ तारखेला या समितीचे सायंकाळी ५ वाजता औरंगाबादला आगमन होणार असून, औरंगाबाद जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी व अभियंता यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)