क्रांतीदिन उपक्रम : हुदलीकर यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवादनाशिक : नाशिक हेरिटेज ग्रुपच्या हेरिटेज टॉक उपक्रमांतर्गत सदस्यांनी सीबीएस येथील हुतात्मा स्मारक येथे भेट देऊन हुतात्मा स्मारकाची माहिती घेण्यात आली. याप्रसंगी हेरिटेजचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामनाथ रावळ, केटीएचएमच्या उपप्राचार्य प्रा. स्नेहल सोनवणे, स्वातंत्र्यसैनिक वसंतराव हुदलीकर, पंडित येलमामे, दगडुसा कलाल, सरस्वती मोरे, निखिल देशमुख, प्रशांत पाटील, स्वरूप डावखरे आदि उपस्थित होते. यावेळी केटीएचएम महाविद्यालयाचे इतिहास विभागाचे विद्यार्थी व प्राध्यापक, हेरिटेजचे सदस्य व नागरिक यांना स्वातंत्र्यसैनिक वसंतराव हुदलीकर, पंडित येलमामे, दगडुसा कलाल यांनी आॅगस्ट क्रांतिदिनाचा लढा, गोवा मुक्ती संग्राम, दीव-दमण मुक्ती संग्राम, स्वातंत्रलढा याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी हेरिटेजच्या वतीने मान्यवरांचा पुष्प व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर हेरिटेजच्या सदस्यांनी हुतात्मा स्मारकाची पहाणी करून विविध स्वातंत्र्यसेनानी यांच्या कार्याची माहिती घेतली. स्मारकात सुरू असलेल्या विविध उपक्रमांचीही यावेळी माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)
‘हेरिटेज टॉक’ची स्मारकाला भेट
By admin | Updated: August 10, 2016 00:49 IST