शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विष्णूपुरीत १८ दलघमी पाणी

By admin | Updated: May 27, 2014 01:02 IST

नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पात सध्या १८ दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून नांदेड शहराला जुलै अखेरपर्यंत पाणी पुरणार आहे़

 नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पात सध्या १८ दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून नांदेड शहराला जुलै अखेरपर्यंत पाणी पुरणार आहे़ यंदा प्रकल्पातील मुबलक पाण्यामुळे नांदेडला पाणी टंचाईचा सामना करावा लागला नाही़ ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर अवकाळी पावसाने नद्या, नाल्यांना पाणी आले आहे़ त्यामुळे नांदेडकरांची तहान भागविणार्‍या विष्णूपुरी प्रकल्पातील पाणीपातळी वाढली होती़ उन्हाळ्यात पाणीटंचाई होवू नये म्हणून पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे वेगळे परिश्रम महापालिकेला घेण्याची वेळ आली नाही़ प्रकल्पातील मुबलक पाण्यामुळे नागरिकांचाही पाण्याचा प्रश्न संपला आहे़ अल्प पावसामुळे मागील दोन वर्षांपासून विष्णूपुरी प्रकल्पातील उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे़ ऐन उन्हाळ्यात दोन, तीन दिवसाआड पाणी सोडावे लागले़ त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला, असे म्हणण्याची वेळ येत असे़ यावर्षी पावसाने सरासरी ओलांडल्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पात ७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला़ उपलब्ध पाणी जून महिन्यापर्यंत पुरविण्यासाठी जानेवारीपासून एक दिवसाआड पाणी सोडण्यात येत आहे़ नांदेडकरांना उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू नये म्हणून दिग्रस बंधार्‍यातील आरक्षित पाण्याचे नियोजन करण्यात आले होते़ परंतु अवकाळी पावसाने प्रकल्पात चांगलीच वाढ केली़ १३ दलघमी पाणीसाठा वाढला होता़ १ मार्च रोजी विष्णूपुरी प्रकल्पात २३ दलघमी पाणीसाठा होता़ तर १४ मार्च रोजी प्रकल्पात ३६़५७ दलघमी साठा उपलब्ध होता़ तर २६ मे रोजी १८ दलघमी पाणीसाठा उपलब्ध असल्याचे सूत्रांनी सांगितले़ (प्रतिनिधी) जिल्ह्यात १६ टँकरद्वारे ५ गावे अन् १४ वाडीतांड्यांना पाणी जिल्ह्यात आॅक्टोबर ते जून या कालावधीकरिता संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला असून या कृती आराखड्यानुसार १६ टँकरद्वारे ५ गावे आणि १४ वाडीतांड्यात पाणीपुरवठा सुरु असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डी़ एच़ डाकोरे यांनी दिली़ जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ९५५़५५ मिलीलिटर असून मागील वर्षी जिल्ह्यात ११४ टक्के पर्जन्यमान झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवत नाही़ सध्या जिल्ह्यातील भोकर तालुक्यात १ टँकर, मुखेड-६, कंधार -५ तर लोहा तालुक्यात ४ टँकर सुरु आहेत़ त्याचप्रमाणे जिल्ह्यात १७५ खाजगी विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहित करुन १४० गावे व २५ तांड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ जिल्ह्यात ९३७ विंधन विहिरीची विशेष दुरुस्ती मंजूर असून ४९६ ठिकाणीची विंधन विहिरीची दुरुस्ती करण्यात आली़ जिल्ह्यात ७३ नवीन विंधन विहिरी घेण्याच्या कामास जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली आहे़ त्यात नांदेड तालुक्यासाठी ७, मुदखेड ११, भोकर १२, हदगांव १७, बिलोली १२ तर किनवट तालुक्यात १४ विंधन विहिरींचा समावेश आहे़ तसेच १८१ नवीन विंधन विहिरींचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत़