शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’च्या मोजणीला हिंसक वळण

By admin | Updated: April 8, 2017 00:17 IST

सिन्नर : प्रस्तावित नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गाच्या संयुक्त मोजणीला सिन्नर तालुक्यातील शिवडे येथील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला.

 सिन्नर : प्रस्तावित नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गाच्या संयुक्त मोजणीला सिन्नर तालुक्यातील शिवडे येथील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. मोजणी करू न देण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम होते तर अधिकारी मोजणी केल्याशिवाय माघारी जाण्याच्या मन:स्थितीत नसल्याने घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाला. शेतकऱ्यांनी रस्त्यावर टायर पेटवून आपला विरोध दर्शविला. त्यानंतर अधिकाऱ्यांसोबत झालेली बाचाबाची व किरकोळ दगडफेक यामुळे मोजणीला हिंसक वळण प्राप्त झाल्याचे चित्र होते. प्रस्तावित नागपूर-मुंबई मार्गाच्या संयुक्त मोजणीला प्रारंभ करण्यात आला आहे. या मोजणीला गावोगावी शेतकरी विरोध दर्शवित आहेत. शुक्रवारी शेतकरी आक्रमक झाल्याचे शिवडे येथील मोजणीप्रसंगी दिसून आले. मोजणीला आलेल्या अधिकाऱ्यांना शिवारातच येवू द्यायचे नाही असा निर्णय शिवडे येथील शेतकऱ्यांनी घेतला होता. सकाळपासून शिवडे-पांढुर्ली रस्त्यावर शेकडो शेतकरी व महिला ठाण मांडून बसले होते. मात्र मोजणीसाठी आलेल्या पथकाने पोलीस बळाचा वापर करीत शेतकऱ्यांचा विरोध मोडीत काढत सायंकाळपर्यंत मोजणी केली.गुरुवारी सोनांबे येथे शेतकऱ्यांचा विरोध झुगारुन मोजणी केल्यानंतर शुक्रवारी सकाळी मोजणी पथक पोलिसांचा मोठा फौजफाटा घेवून सावतामाळीनगर येथे दाखल झाले. पोलीस बंदोबस्तात येथे शेतजमिनीची मोजणी करण्यात आली. याची खबर शिवडे येथील शेतकऱ्यांनी होती. त्यामुळे शेतकरी अगोदरपासूनच विरोध करण्यासाठी तयारीत होते. शेकडो शेतकरी शिवडे-पांढुर्ली रस्त्यावर टायर पेटवून आपला विरोध दर्शवित असल्याची खबर मोजणी पथकाला होती. त्यामुळे चर्चेसाठी सुरुवातीला शेतकऱ्यांना आमंत्रण पाठविण्यात आले. मात्र शेतकरी मोजणी करु न देण्याच्या भूमिकेवर ठाम होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, प्रांताधिकारी महेश पाटील, तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांच्यासह संयुक्त मोजणी अधिकाऱ्यांचे पथक अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, निफाड विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी दीपक गिऱ्हे, तृप्ती आठवले यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा लवाजमा व शीघ्र कृती दलाच्या दोन तुकड्या घेवून शिवडे गावाकडे रवाना झाले. या ताफ्यात दोन अग्निशामक बंब, रुग्णवाहिका व क्रेन होते. पांढुर्ली-शिवडे रस्त्यावर शेकडो शेतकरी रस्त्यावर टायर पेटवून आंदोलनाच्या तयारीत होते. संयुक्त मोजणीचा ताफा शिवडे शिवारात आल्यानंतर शेतकऱ्यांनी मोजणी न करता माघारी जाण्याची विनंती केली. मात्र मोजणी करण्याच्या भूमिकेवर अधिकारी ठाम असल्याने शाब्दीक चकमक झाली. चर्चेतून मार्ग निघत नसल्याने शेतकऱ्यांना बाजूला जाण्याचा सल्ला अधिकाऱ्यांनी दिला. त्यानंतर वातावरणत चिघळण्यास प्रारंभ झाला. पोलीस कर्मचारी व शीघ्र कृती दलाच्या जवानांनी आंदोलनकर्त्यांना घेराव घालण्यास प्रारंभ केला. त्यामुळे उपस्थित शेतकरी सैरभैर होण्यास प्रारंभ झाला. पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेवून पोलीस वाहनात बसविण्यास प्रारंभ केल्यानंतर प्रंचड गोंधळ निर्माण होवून किरकोळ दगडफेक झाली. शेतकरी संघर्ष समितीचे राजू देसले, रावसाहेब हारक यांच्यासह काही शेतकऱ्यांसोबत प्रांताधिकारी महेश पाटील यांनी चर्चा केली. एकीकडे चर्चा सुरु असतांना दुसरीकडे अधिकाऱ्यांनी मोजणीस प्रारंभ केला होता. मोजणी सुरु असल्याचे महिलांच्या लक्षात येताच त्यांनी मोजणीस्थळी जावून पुन्हा प्रखर विरोध करण्यास प्रारंभ केला.(वार्ताहर)