शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

विजयनगर जोड रस्त्यावर व्यावसायिकांचे अतिक्रमण

By admin | Updated: December 30, 2015 23:10 IST

नागरिकांचा आरोप : मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष

पंचवटी : नवीन आडगाव नाक्यावरील विजयनगर सोसायटी नजीकच्या जोड रस्त्यावर विविध वस्तू विक्रेते तसेच हातगाडीधारकांनी अतिक्रमण केल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली असून, या अतिक्रमणाकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला जात आहे. विजयनगर परिसरात दाट लोकवस्ती असून, या विजयनगरच्या प्रवेशद्वारालगत असलेल्या भिंतीनजीक खाद्यपदार्थ विक्री, चायनीज गाड्या, पानटपरी तसेच मटन मांस विक्री करणारी दुकाने थाटलेली असल्याने परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. उघड्यावरच असलेल्या मटन मांस विक्रीच्या दुकानामुळे मोकाट श्वानांचाही उपद्रव वाढला आहे. याशिवाय हातगाड्यावर अनेक टवाळखोर उभे राहत असल्याने वाद होण्याची शक्यता असते. गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील जोड रस्त्यावर विविध व्यावसायिकांनी दुकाने थाटल्याने त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. याशिवाय व्यावसायिकांची, तसेच त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांची वाहने रस्त्यावरच उभी केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. महापालिका प्रशासनाच्या वतीने संपूर्ण शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असली तरी नवीन आडगाव नाक्यावरील विविध व्यावसायिकांच्या अतिक्रमणाकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)