शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

नियमांचे उल्लंघन : मेनरोडवर शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 21:36 IST

कळवण : शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत भाजीपाल्याची खरेदी होण्याच्या उद्देशाने प्रशासनाने मेनरोडवर तात्पुरत्या स्वरूपात भाजीबाजाराची व्यवस्था केली.

ठळक मुद्देकळवणला ग्राहकांची गर्दी; प्रशासनाकडून बाजार बंद

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत भाजीपाल्याची खरेदी होण्याच्या उद्देशाने प्रशासनाने मेनरोडवर तात्पुरत्या स्वरूपात भाजीबाजाराची व्यवस्था केली. शुक्रवार ते रविवार नागरिक व विक्रेत्यांनी मेनरोडवर गर्दी करताना नियमांची पायमल्ली केल्याचे दिसून आले. कुठल्याही प्रकारचे विशिष्ट अंतर ठेवल्याचे दिसून न आल्याने पोलीस प्रशासनाने बाजार बंद करीत सर्वांना अक्षरश: घरी हाकलून लावले. यावेळी न ऐकणाऱ्या काही जणांना काठीचा प्रसाददेखील द्यावा लागला. यावेळी तहसीलदार बी. ए. कापसे, मुख्याधिकारी सचिन माने, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी कायदेशीर कारवाई करण्यास भाग पाडू नका, असा सज्जड दम दिल्यानंतर अवघ्या काही वेळातच मेनरोडसह बसस्थानक, महाराजा चौकात शुकशुकाट झाला.सध्या राज्यासह देशात, गावागावांत कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे संपूर्ण लॉकडाउन असूनदेखील कळवण नगरपंचायतीने नागरिकांना अडचण निर्माण होऊ नये म्हणून मेनरोड, बसस्थानक परिसर, महाराजा चौकात भाजीबाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र नागरिकांनी भाजीबाजारात खरेदी करण्यासाठी शुक्र वार, शनिवार व रविवारी मोठी गर्दी केली होती. २१ दिवसांच्या लॉकडाउन पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांची या तीन दिवसात पायमल्ली झाल्याचे दिसून आले.नागरिकांच्या तसेच भाजीबाजार विक्रेत्यांच्या तोंडावर मास्क दिसून आले नाही. सॅनिटायझरचाही वापर कुठेही दिसून आला नाही. शहरातील बाजार मंडईमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन नागरिकांना अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सोशल डिस्टन्स ठेवून भाजी बाजाराचे नियोजन करण्यात आले होते, मात्र कळवणकर जनतेने भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर गर्दी केल्याने प्रशासनाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. शहरातील वाढती गर्दी भाजी बाजारात होत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्वरित गर्दीला हाकलून लावले तसेच भाजी बाजार बंद केला. सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाºया किराणा दुकानदार, भाजी विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मुळीच जाऊ नका आणि घरच्यांनाही कोणाला जाऊ देऊ नका, भाजीविक्रेता हा आपल्या गल्लीत येईल तेव्हा भाजी घ्यावी, त्याचीही स्वच्छता लक्षात घ्यावी, घरात राहा, नियम पाळा, स्वत:ची काळजी घ्या आणि कोरोना या संसर्गजन्य आजाराला पळवून लावा.- प्रमोद वाघ, पोलीस निरीक्षक कळवण

टॅग्स :GovernmentसरकारTravel Tipsट्रॅव्हल टिप्स