शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

उकड्यामुळे द्राक्षबागा पुन्हा संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 00:13 IST

डावणी व भुरी, घडकूज या रोगांपासून वाचलेल्या द्राक्षबागांवर आता उकड्याचे प्रमाण वाढल्याने बागा पुन्हा धोक्यात आल्या आहेत. बागेतील निम्म्यापेक्षा जास्त द्राक्षघड उकड्याला बळी पडले आहे, तर थंडीने द्राक्षमण्यांना तडे गेल्याने उत्पादनात घट येणार असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

पाटोदा : डावणी व भुरी, घडकूज या रोगांपासून वाचलेल्या द्राक्षबागांवर आता उकड्याचे प्रमाण वाढल्याने बागा पुन्हा धोक्यात आल्या आहेत. बागेतील निम्म्यापेक्षा जास्त द्राक्षघड उकड्याला बळी पडले आहे, तर थंडीने द्राक्षमण्यांना तडे गेल्याने उत्पादनात घट येणार असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.गेल्या एक-दीड महिन्यापासून वातावरणात सतत बदल होत असल्याने द्राक्षबागांवर विविध रोगांनी थैमान घातले आहे. पहिला रोग आटोक्यात येण्याच्या वेळेस दुसरा रोग दारात उभा राहत असल्याने द्राक्षबागांवर बुरशीनाशके व औषध फवारण्या वाढल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या मागे संकटांचे ग्रहण लागले आहे. संकटाचे ग्रहण सुटण्याची शक्यता कमी झाली आहे.अवकाळी पावसामुळे येवला तालुक्यातील निम्म्याहून जास्त द्राक्षबागांना यावर्षी फळधारणा न झाल्याने शेतकऱ्यांनी द्राक्षबागांसाठी एकरी चार ते पाच लाख रुपयांपर्यंत केलेला संपूर्ण खर्च वाया गेल्याने शेतकºयांचे नुकसान झाले आहे. ज्या काही थोड्याफार द्राक्षबागा वाचल्या होत्या त्या बागांना वातावरणातील बदलामुळे विविध रोगांना सामोरे जावे लागत आहे.औषध फवारणीचा परिणामगेल्या काही दिवसांपासून परिसरात पहाटे धुके, सकाळी दव व दिवसभर ढगाळ वातावरण राहत असल्यामुळे द्राक्षबागांवर डावणी, भुरी, घडकूज व इतर रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने या रोगांपासून बागा वाचविण्यासाठी शेतकरीवर्गाने द्राक्षबागांवर बुरशीनाशक व महागड्या औषधांची फवारणी केली. वातावरणातील सततचा होत असलेला बदल व या जास्तीच्या औषध फवारणीचा द्राक्षमण्यांवर परिणाम झाला असून, द्राक्षघडातील निम्म्यापेक्षा जास्त मणी उकड्याला बळी पडले आहेत. उकड्याने द्राक्षमणी हे नरम होऊन खराब होत असल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून,त्याला हुडहुडी भरली आहे.सतत बदलते वातावरण, थंडी, धुके, दव व पावसामुळे औषध फवारणी वाढली. वातावरण व औषध फवारणीचा ताळमेळ न बसल्याने उकड्याचे प्रमाण वाढले आहे. या उकड्याने शेतकºयांना लाखो रु पयांच्या नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे.- लक्ष्मण शेळके,द्राक्ष उत्पादक, ठाणगाव

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र