शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

इगतपुरी पंचायत समितीच्या उपसभापतीपदी विमल गाढवे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 15:23 IST

घोटी : इगतपुरी पंचायत समितीच्या उपसभापती पदी शिवसेनेच्या सौ विमलबाई नामदेव गाढवे यांची आज निवड करण्यात आली. मावळत्या उपसभापती तथा शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख राजू नाठे यांच्या पत्नी जिजाबाई नाठे यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसभापती पदासाठी ही निवड करण्यात आली.

ठळक मुद्देदहा वर्षाने विमलबाई गाढवे यांना उपसभापतीपद पूर्व भागाकडे गेले.

घोटी : इगतपुरी पंचायत समितीच्या उपसभापती पदी शिवसेनेच्या विमलबाई नामदेव गाढवे यांची आज निवड करण्यात आली. मावळत्या उपसभापती तथा शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख राजू नाठे यांच्या पत्नी जिजाबाई नाठे यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसभापती पदासाठी ही निवड करण्यात आली.इगतपुरी पंचायत समीतीचे सभापतीपद हे आदिवासी प्रवर्गासाठी राखीव असल्याने उपसभापतीपदाला विशेष महत्व आहे. त्यामुळे जिजाबाई नाठे यांनीही आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने उपसभापतीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत उत्कंठा होती. त्यासाठी शिवसेनेच्याच सौ विमलबाई गाढवे यांच्या नावाची प्रारंभीपासूनच चर्चा होती. त्याच चर्चेवर आज शिक्कामोर्तब झाले.तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या अध्यक्षतेखाली व सभापती सौ जया कचरे यांच्या उपस्थितीत झालेल्या पंचायत समितीच्या निवड बैठकीत उपसभापती पदासाठी विमल गाढवे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने गाढवे यांची निवड जाहीर करण्यात आली.यावेळी सभागृहात पंचायत समिती मावळत्या उपसभापती जिजाबाई नाठे, विठ्ठल लंगडे, भगवान आडोळे, मच्छीन्द्र पवार, सोमनाथ जोशी , विमल तोकडे, कल्पना हिंदोळे कौसाबाई करवंदे, आदी सदस्य उपस्थित होते. निवडणुकीस सहायक म्हणून गटविकास अधिकारी डॉ लता गायकवाड सहायक बीडीओ भरत यंदे, आदीनी काम पाहिलेया निवडीप्रसंगी माजी आमदार शिवराम झोले, माजी जि प सदस्य जनार्धन माळी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, जि प सदस्य हरिदास लोहकरे , सुनिल वाजे, माजी सभापती संपत काळे, कचरू डुकरे, पांडुरंग ब-हे, नंदलाल गाढवे, नामदेव गाढवे मोहन ब-हे,माजी तालुकाप्रमुख राजू नाठे, माजी सभापती रघुनाथ तोकडे, मधुकर कोकणे, हरिभाऊ वाजे, पांडुरंग गाढवे, पांडुरंग शिंदे, बाळासाहेब सुराणा, देविदास जाधव, केरू पा देवकर उपस्थित होते.एकाच गटाचा योगायोग ----इगतपुरी तालुक्यात टाकेद - खेड गट हा नेहमीच प्राबल्यवाण ठरत असतो. निवडणुकीतही जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत या गटाने एकहाती विजय मिळविला होता. विशेष म्हणजे याच गटातील सौ जया कचरे या सभापती आहे तर सौ विमल गाढवे यांच्या रूपाने उपसभापतीपदही त्याच गटाकडे गेल्याने तालुक्याची धुरा व विकासाचा गाडा आता खेड गटाकडे असणार हे स्पष्ट झाले आहे त्यामुळे हा योगायोग आहे. सिंधुबाई वाजे यांच्यानंतर दहा वर्षाने विमलबाई गाढवे यांना उपसभापतीपद पूर्व भागाकडे गेले.विमल गाढवे या शिवसेनेच्या वतीने जरी उपसभापतीपदी निवड झाल्या असल्या तरी या निवडीप्रसंगी सर्वपक्षीय पदाधिकारी  सहभागी झाले होते त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा या पक्षातील प्रमुख पदाधिकारी व समर्थक यांचा भरणा अधिक होता. 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक