शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण कवितांचे ‘गाव व्हिलेज झालंय’

By admin | Updated: January 23, 2017 00:36 IST

ग्रंथ सप्ताह : कवितांमधून व्यक्त झाल्या भावना

नाशिक : ‘सत्ययुगाच्या सांगत गोष्टी अवतरला तरी काळ रे, अजून पाण्यासाठी वण वण फिरतो श्रावण बाळ रे’ ही रवींद्र कांगणे यांची, तर विष्णू थोरे यांनी सादर केलेल्या ‘सारं फुकाचं वाटून बाप माझा झाला तुका, शिळे कोरके खाऊन आम्ही जागवल्या भुका’ या आाणि अशा विविध कवितांचे सादरीकरण रविवारी (दि. २२) झालेल्या ‘गाव व्हिलेज झालंय’ या कार्यक्रमात करण्यात आले.सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्यातर्फे मु. शं. औरंगाबादकर सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथालय सप्ताहात रविवारी ‘गाव व्हिलेज झालंय’ या मातीतील कवितांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात रवींद्र कांगणे (सिन्नर), संदीप जगताप (दिंडोरी), विष्णू थोरे (चांदवड), तुकाराम धांडे (इगतपुरी) या कवींनी विविध कवितांचे सादरीकरण केले. यावेळी तुकाराम धांडे यांनी ‘साहीब, अव इथ कयाचा धर्म - जात - पात’ या ग्रामीण भागातील रखडलेल्या योजनांवर आधारित कवितेचे सादरीकरण करून ग्रामीण भागातील राजकारणावर प्रकाशझोत टाकला. यानंतर संदीप जगताप यांनी नोटाबंदीवर आधारित ‘वावराला नांगराचा उभ्या आडव्या पाळ्या दिल्या, आमचच आयुष्य झालय हजार पाचशेची जुनी नोट’ ही कविता सादर केली. विष्णू थोरे यांनी ‘वेदनेच्या विहिरीचा बाई तळ लयी खोल दु:ख साकडून येते मुखी डोळ्यामधी वल’, रवींद्र कांगणे यांनी ‘दूर अंधार करण्या बाप जळत राहिला’, तुकाराम धांडे यांनी ‘आई होती तेव्हा जातं गाण गायचं’ आणि रवींद्र कांगणे यांनी बहिणीच्या लग्नाची सीडी बघताना अख्ख घर गच्च भरलेल’ आदि कवितांचे सादरीकरण केले. यावेळी सावानाचे कार्यवाह कर्नल आनंद देशपांडे, उपाध्यक्ष नरेश महाजन, सांस्कृतिक सचिव वेदश्री थिगळे, नाट्यगृह सचिव जयप्रकाश जातेगावकर, देवदत्त जोशी यांच्यासह काव्यप्रेमी उपस्थित होते. (प्रतिनिधी)